🌟पुर्णा पोलिस स्थानकाचा पदभार पालम पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे यांच्याकडे...!


🌟जनसामान्यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी जिव्हाळ्याचे नाते जोपासत कायद्याची कठोर अंमलबजावणी करणारे अधिकारी🌟


परभणी/पुर्णा (दि.०६ जुलै २०२३) - पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांची नांदेड जिल्ह्यात बदली झाल्यामुळे त्यांच्या जागेवर पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक म्हणून कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले असतांनाच काल बुधवार दि.०५ जुलै २०२३ रोजी परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिक्षक श्रीमती रागसुधा आर यांनी जिल्ह्यातील तब्बल १२ पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या ज्यात पुर्णा पोलिस स्थानकाचा पदभार नुतन पोलिस निरिक्षक म्हणून पालम पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री.प्रदिप काकडे यांच्याकडे देण्यात आला आहे. 

परभणी जिल्ह्यातील पुर्णा-पालम-गंगाखेड विधानसभा मतदार संघातील पालम पोलिस स्थानकात यशस्वीपणे आपले कर्तव्य बजावलेले वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रदिप काकडे यांनी पालम तालुक्यात घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास सखोल चौकशी करीत यशस्वीपणे लावल्याचे सर्वश्रुत असून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ०५-३० वाजेच्या सुमारास पालम तालुक्यातील फळा येथील अवघ्या ०४ वर्षे वयाच्या शिवराज खांबे या बालकाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवलेल्या या घटनेचा यावेळी जिल्ह्याच्या जिल्हा पोलिस अधिक्षक आर रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे तपास करित पो.नि.प्रदिप काकडे व सहकारी पथकाने महाराष्ट्रातील देगलूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील तेलंगणा सिमेवर सापळा रचून अपहरण करणारा आरोपी गोविंद रानडेसह एका महिलेला ताब्यात घेऊन अपहरण प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावत ०४ वर्षीय बालकासह एका २४ वर्षीय तरुणाची देखील चोवीस तासात सुटका केली होती.  

पालम तालुक्यात कार्यरत असतांना पोलिस निरिक्षक प्रदिप काकडे यांनी जनसामान्यांच्या जनहीतासह व्यापारी प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसिध्दीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी देखील जिव्हाळ्याचे नाते जोपासत पालम तालुक्यात सातत्याने कायदा व सुव्यवस्था चोखपणे हाताळण्याचे काम केले त्यामुळे जिल्ह्यात अतिसंवेदनशिल तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा तालुक्याचा पदभार जिल्हा पोलिस अधिक्षक आर रागसुधा यांनी पो.नि.काकडे यांच्याकडे देऊन एकप्रकारे पुर्णा तालुक्यातील जनसामान्यांच्या अपेक्षांची पुर्तीच केल्याचे निदर्शनास येत आहे.......  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या