🌟पत्रकार सुरक्षा समितीचे शिस्टमंडळ लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची भेट घेणार......!


🌟राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालून यावर कायम तोडगा काढण्याची मागणी करणार🌟


परभणी ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले जात आहेत  त्याच बरोबर राज्यातील पत्रकारांचे काही विषय प्रलंबित असून पत्रकार संरक्षण समिती यावेळी पत्रकारांच्या हिताच्या उपरोक्त मागण्यांवर चर्चा करणार आहे :-

*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजने प्रभावीपणे अंमलबजावणी करणे बाबत *

*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी करणे बाबत*

*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती मिळणे बाबत उपाययोजना*

*राज्यातील युट्युब व पोर्टल या महत्वाच्या प्रसार माध्यमांना शासकीय मान्यता मिळणे बाबत*

*प्रभावी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्या संदर्भात उपाययोजना*

*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना तात्काळ लागू करणे बाबत*

*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे बाबत*

*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देण्याची मागणी *

*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती योजना देणे संदर्भात मागणी*

*खंडणी सारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*

*पत्रकारांवर वेळोवेळी होणारे हल्ले गंभीर मारहाण जिवे मारण्याच्या धमक्या*

या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्ट मंडळ लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न कानावर घालणार पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा वतीने बैठक घेण्यात आली असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मांडणार आहेत....

 या बैठकीला पत्रकार सुरक्षा समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष शेषेराव सोपणे (मामा ) जिल्हा सरचिटणीस प्रसाद पौळ जिल्हा उपाध्यक्ष सदानंद हत्ती आंबेरे पालम तालुका अध्यक्ष वाहेदखान पठाण  तसेच इतर पदाधिकारी  उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या