🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळीत ग्रामपंचायतच्या वतीने 'एक दिवस श्रमदान' या उपक्रमाचे आयोजन...!


🌟धनगर टाकळी ग्रामपंचायत आणि गावकरी मंडळी यांचा आगळा वेगळा उपक्रम🌟


पुर्णा (दि.११ जुलै २०२३) - पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी ग्रामपंचायतच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून आज मंगळवार दि.११ जुलै २०२३ रोजी सकाळी ०६-०० ते ०८-०० वाजेच्या सुमारास धनगर टाकळी येथे राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळेपासून ते नवीन बस स्टॅन्ड रोडच्या बाजूने असलेल्या झाडांच्या भोवतालच्या गावातील केरकचरा,जास्तीच्या वाढलेल्या रहदारीला अडथळा करणाऱ्या झाडांच्या फ़ांद्या,साफ सफाई केली.


धनगर टाकळी गावात तब्बल दोन तास ग्रामसेवा म्हणून या श्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामपंचायत प्रशासनातील सर्व कर्मचारी/अधिकारी ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या टीमसह गावातील मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या