🌟सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा विद्यार्थी कुंदन नरेश पाटील शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात आठवा...!


🌟मराठी माध्यमातून कुंदन पाटील याने सेलू तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला🌟

सेलू (दि.14 जुलै 2023) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने 12 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचा कुंदन नरेश पाटील ( 216 गुण) याने सेलू तालुक्यातून आठवा येण्याचा तर जिल्ह्यातून 61 वा येण्याचा बहुमान पटकावला आहे.विशेष म्हणजे मराठी माध्यमातून कुंदन पाटील याने सेलू तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल रविवार 30 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.यामध्ये जिल्ह्याचा निकाल 14 टक्के लागला.यामध्ये श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील कुंदन नरेश पाटील हा 216 गुण घेऊन मराठी माध्यमातील शाळेतून सेलू तालुक्यातून प्रथम आला आहे.

कुंदन पाटीलच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी,सचिव महेश खारकर,सहसचिव अभय सुभेदार,संचालक जयंतराव दिग्रसकर,ऍड.किशोर जवळेकर,विष्णूपंत शेरे,डॉ.प्रवीण जोग,प्रवीण माणकेश्वर, ललित बिनायके,रामेश्वर राठी,अशोक चामणीकर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.यु.हळणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पी.एस.कौसडीकर यासह शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या