🌟धनगर टाकळीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न...!


🌟सामान्य ज्ञान स्पर्धेत एकून 250 विद्यार्थांनी घेतला होता सहभाग : 08 विद्यार्थ्यांनी मिळवले बक्षीस🌟


पुर्णा (दि.12 जुलै 2023) - पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती महोत्सव -2023  निमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन दोन गटात करण्यात आले होते पहिल्या गटात इयत्ता 05 वी ते 07 वी तर दुसऱ्या गटात इयत्ता 08 वी ते 10 वीचा समावेश करण्यात आला होता या घेतलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल आज बुधवार दि.12 जुलै 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी येथे जाहीर करण्यात आला  तसेच त्याच ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पण पार पडला.


या सामान्य ज्ञान स्पर्धेत एकूण 08 विद्यार्थ्यांनी नंबर मिळवले स्पर्धेत एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमास ग्रामपंचायत धनगर टाकळी ची संपूर्ण टीम सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक सर, सर्व गुरुजन वर्ग,जयंती मंडळाचे कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमध्ये मुख्यध्यापक आणि सरपंच यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅरिअर बद्दल आणि स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. शैक्षणिक अडचणी मध्ये विद्यार्थी वर्गाला आणि शिक्षक वर्गाला लागेल ती मदत पुरवू असा विश्वास गावचे सरपंच यांनी दिला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या