🌟पुर्णा-थुना नदी काठांवरील गोरगरीब मागासवर्गीय आदीवासी वसाहतीतील नागरिक शुध्द पिण्याच्या पाण्यापासून वंचित...!


🌟मुख्याधिकारी यांचे बेताल वक्तव्य : म्हणे नगर परिषदेकडे पैसे नाही ? नळ कनेक्शनसाठी पैसे भरा पाईपलाईन करतो🌟


पुर्णा (दि.२५ जुलै २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनात स्वतःला जनसेवक कमी अन् जनमालक जास्त समझणारे हुकूमशाही प्रवृत्तीचे अधिकारी कार्यरत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आपल्या मुलभुत नागरी हक्कांपासून वंचित राहावे लागत असून नगर परिषद प्रशासनांतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये कोट्यावधी रुपयांची बोगस कामांची मालिका सुरु असतांना जणूकाही गेंड्याच्या कातडीचा बूरखा पांघरलेले भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी 'तुम्ही करा बकबक आम्ही आहोत निब्बरगट्ट' या आवेशात मुलभूत नागरी सुविधांसह शहरातील बोगस व निकृष्ट कामांसंदर्भात तक्रार अर्ज देण्यास नगर परिषदेत गेल्यास त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याऐवजी त्यांच्याशी हुकूमशाही प्रवृत्तीचे अधिकारी/कर्मचारी बेताल बेजवाबदार भाषेचा वापर करीत त्यांना अवमानीत करीत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की पुर्णा-थुना नदीकाठालगत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,नाका परिसर आहीरे गल्ली तसेच अशोक नगर,भिम नगर,बागवान गल्ली,खुरेशी गल्ली,डोबी गल्ली,विणकर वाडा,नवीन आबादी,कोळी गल्ली,साई मंदिर परिसर,कोमटवार गिरणी परिसरातील गोरगरीब मागासवर्गीय,आदीवासी अल्पसंख्यांक नागरिकांना मागील अनेक वर्षापासून नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजने अंतर्गत होणाऱ्या शुध्द पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे या परिसरात नगर परिषद प्रशासनाने मागील अनेक दशकापुर्वी टाकलेली पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन काही भागात फुटलेली तर काही भागात ब्लॉक झालेली असल्यामुळे या भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही एखादं वेळेस नळाला पाणी आले तरी ते अल्प व अशुध्द येते त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला प्रचंड धोका निर्माण झाला असून या भागातील गोरगरीब मागासवर्गीय आदीवासी कोळी अल्पसंख्यांक नागरिकांना मलेरीया काविळ डेंग्यू गॅस्टो सारख्या आजारांना सातत्याने सामोरे जावे लागते या परिसरांमध्ये नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना संपूर्णपणे कोलमडल्यामुळे या परिसरात तात्काळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी परिसरात हँन्डपम्प टाकण्यात यावेत या मागणीचे निवेदन घेऊन काल नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ यांना भेटण्यास गेलेल्या 'माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठानच्या' शिस्टमंडळाला मुख्याधिकारी पौळ यांनी या गंभीर प्रश्नावर समाधानकारक तोडगा काढण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल उचलून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येईल असे समाधानकारक उत्तर न देता चक्क पुर्णा नगर परिषदेकडे पैसा उपलब्ध नसून तुम्हीच नळ कनेक्शनसाठी पैसे जमा करा तुमच्याच पैस्याने तुम्हाला पाणीपुरवठा पाईप लाईन करुन देतो असे बेताल बेजवाबदार उत्तर दिल्यामुळे माझी पुर्णा संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजु नारायनकर यांनी मुख्याधिकारी पौळ यांना प्रतिप्रश्न करीत विचारले मग नगर परिषद प्रशासनाकडे शहरातील विविध प्रभागांमध्ये होणाऱ्या बोगस व निकृष्ट विकासकामांना पैसा कसा आला ? यावर पौळ यांनी उत्तर देण्याऐवजी मौन बाळगले  यावरुन असे निदर्शनास येते की पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पौळ भ्रष्ट गुत्तेदारांसह नगर परिषदेतील घोटाळेबाज भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना देखील सोईस्कररित्या पाठीशी घालून नगर परिषदे अंतर्गत भ्रष्ट बेईमानशाहीला प्रोत्साहन देत आहेत......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या