🌟प्रहार जनशक्ती पक्षाचा परभणी कार्यकारिणी विस्तार.....!


🌟तालुका प्रमुखपदी उद्धव गरुड,शहर प्रमुखपदी अंकुश गिरी तर शहर चिटणीसपदी वैभव संघई यांची नियुक्ती🌟

परभणी (दि.०८ जुलै २०२३) - प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक दि. ०७ जुलै २३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा करण्यात आली तसेच पक्षाच्या परभणी तालुका व शहर कार्यकारिणीचा विस्तार करून काही नव नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यात परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा येथील पक्षाचे शाखा प्रमुख उध्दव गरुड यांची परभणी तालुका प्रमुखपदी तर प्रहारचे जुने कार्यकर्ते अंकुश गिरी यांची परभणी शहर प्रमुखपदी तसेच वैभव संघई यांची परभणी शहर चिटणीस मीडिया विभाग या पदावर नव नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षाचे मीडिया प्रभारी नकुल होगे यांनी केले.बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, शहर चिटणीस मीडिया वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, सरचिटणीस ॲड. सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, माणिक कदम, संतोष गरुड, माऊली गरुड, अनिल जाधव, श्रीधर वालेकर, निलेश शेळके, सुखदेव धोंगडे, आत्माराम गरुड, संदीप राऊत, सुनील रिक्षे, वैभव पवार, माणिक हरकळ इत्यादी उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या