🌟छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या शेत शिवारांत वन्य प्राण्यांचा धुमाकून....!


🌟सावळदबारा परिसरात वन्य प्राण्यांकडुन खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान‌🌟

छत्रपती संभाजी नगर (औ.बा.) - जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातल्या सावळदबारा परिसरात वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करत आहेत सावळदबारा परिसरातील ठिकठिकाणीच्या शिवारातील कपाशी.मका.सोयाबीन.उडीद.मुग.आदी पिकांचे रोही व वन्य प्राणी नुकसान करित आहेत.


सावळदबारा परिसरात जून महिन्यात पाऊस न झाल्याने सावळदबारा सह परिसरात पेरणी झाले नाहीत.तर ठिबक वर कपाशी पिकांचे पेरणी केली आहेत.जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहेत. कवळे पिकाचे शेंडे खात पिकांची नासाडी होत  वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते व परिसरातील शेतकरी करित आहेत

  सावळदबारा हा परिसर डोंगर भाग असल्यामुळे हरिण‌.रोही.आदी वन्य प्राणी आहेत सावळदबारा परिसरातील डोंगर जवळील शेत मध्ये वन्य प्राणी हे रात्रीच्या सुमारास येऊन कपाशी.मका. सोयाबीन.उडीद.मुग.हे पिके खाऊन घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना राखन करण्यासाठी शेतात जावे लागत आहेत शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन.मका.पिकांची लागवड केली आहेत.जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली आहेत त्यात आता हे वन्य प्राणी शेतात येऊन पिक खाऊन घेत आहे त्यामुळे शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन राखण करत आहे सावळदबारा परिसरात वन्य प्राणी.कपाशी.मका.सोयाबीन आदी  पिकाचे नुकसान करत आहेत सावळदबारा हा परिसर डोंगर भाग आहेत. शेतक-यांना पिक जगवणे कठिण असते दिवसा सुद्धा रोहीचे टोळी ही शेतात येऊन नुकसान करत आहेत 

सावळदबारा.टिटवी.पळसखेडा.मूर्ती.घाणेगाव,मोलखेडा,देव्हारी,नांदातांडा,पिपळवाडी,हिवरी,नांदागाव,रवळा,जवळा,जामठी,महालब्धा,डाभा.आदी भाग डोंगर असल्यामुळे येथे रात्री च्या सुमारास डोंगर जवळील शेतात रोही च्या टोळी शेतात येऊन.कपाशी.सोयाबीन.पिकांचे नुकसान करत आहेत.सावळदबारा परिसरात शेतकरी रात्री शेतात राखन करण्यासाठी जावे लागते दिवसा सुद्धा शेतात राखन करावे लागते.

सावळदबारा परिसरातील डोंगर जवळील पिके मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी हे पिकांचे नुकसान करत आहेत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा हा परिसर संपूर्ण डोंगर भाग असल्यामुळे डोंगराजवळ शेतातील शेतकऱ्यांना राखण करण्यासाठी शेतात जावे लागते दिवसासुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात रोही येऊन पिकांची नासाडी करतात त्यामुळे सावळदबारा परिसरात शेतकरी रात्रीच्या सुमारास फटाके फोडताना दिसत आहे सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांचे शेत डोंगराजवळ असल्याने वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास शेतात येतात पिकांचे नुकसान करत आहेत डोंगर जवळ तार कुंपण लावण्यात यावे अशी मागणी होत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते व सावळदबारा सह परिसरतील शेतकरी करित आहेत.

...............‌..........‌............................................

* वन्य प्राण्यांकडून खरिप पिकाचे नुकसान :-

 वन्य प्राणी खरिप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.सोयाबीन.मका.कपाशी.हे पिकांचे वन्यप्राणी रात्रीच्या वेळी शेतात येऊन नुकसान करत आहे शेतकरी रात्रीच्या सुमारास शेतात राखण करण्यासाठी जावे लागत आहेत सावळदबारा हा भाग डोंगर भाग आहेत. वन्यप्राणी  रात्रीच्या सुमारास पिकांचे नुकसान करत आहेत.डोंगरजवळ तार कुंपण  लावण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते व शेतकरी करित आहेत  

......................................................................

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या