🌟पालम तालुक्यातील जनतेचे प्रेम कधी विसरणार नाही,जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा - पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे


🌟 पालम येथे आयोजित निरोप समारंभा प्रसंगी पो.नि.काकडे हे बोलत होते🌟


परभणी/पालम (दि.१० जुलै २०२३) - पालम शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पालम तालुक्यातील सर्व स्तरातील लोकांनी मला सहकार्य केले त्यामुळे माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला कसलीही अडचण निर्माण झाली नाही यामुळे येथील जनतेचे प्रेम कद्दापी विसरणार नाही असे प्रतिपादन पालम पोलिस स्थानकाचे पुर्व पोलिस निरीक्षक प्रदिप काकडे यांनी केले ते आज सोमवार दि.१० जुलै २०२३ रोजी पालम येथे आयोजित निरोप समारंभा प्रसंगी बोलत होते.


पालम पोलिस स्टेशन येथे मागच्या दोन वर्षापासुन कार्यरत असताना त्यांनी आपल्या कर्तव्य कौशल्याने अनेक गुन्हे उघडकीस आनुन कायदा व सुव्यवस्था,सामाजिक शांतता अबाधीत ठेवण्यासाठी त्यांनी तत्परतेने आपले कर्तव्य पार पाडत असतांना जनसामान्यात एक वेगळीच ओळख निर्माण करुन त्यांनी शिवजयंती, भिमजयंती, गणपती विसर्जन , या सारख्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या उपक्रमातून जनता आणि पोलीस यांच्या मध्ये अपुलकीची भावना निर्माण करत त्यांनी कर्तव्य पार पाडले.

पालम पोलिस स्थानकात कार्यरत असतांना जनसामान्यांच्या मनात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे कर्तव्यतत्पर पो.नि.प्रदिप काकडे यांची नुकतीच पुर्णा येथे बदली झाली असता पालम पोलिस स्टेशनच्या वतीने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदीप काकडे यांचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक आर.बी.गाडेवाड हे होते,राष्ट्रवादी ता.अध्यक्ष वसंतराव सिरस्कर,भाजपा ता.अध्यक्ष दिवटे ,लक्ष्मणराव रोकडे शेफ चाऊस, जालिंदर हात्तिअंबीरे  (अंकल) यांची प्रमुख उपस्थिती होती .

  यावेळी नव्याने नुकतेच रुजु झालेले पोलिस निरीक्षक आर.बी गाडेवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले सर्व जनतेच्या सहाकार्याने पालम शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था सुरुळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी लिंबाजी टोले,इखार भाई,निवृत्ती हात्तिअंबीरे रिपाई तालुअध्यक्ष, विलास चव्हाण,झेटीग पाटी,भैया सिरस्कर,पोलिस उपनिरीक्षक मारोती कारावार, संदीप भोसले, राजेश्वर पाटिल, बाबाराव बेद्रे, यांच्या सह सर्व पोलिस अधिकारी , कर्मचारी , नगरसेवक, पोलिस पाटील, सरपंच, शांतता कमिटीचे सदस्य , महिला प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक,तालुक्यातील पञकार बांधव उपस्थित होते.

  सदरील कार्यक्रमाचे सुञसंचालन अॕड.रामजी मणीयार व आभार प्रदर्शन सपोनि.सुप्रिया केंदे यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलिस कर्मचारी मोरे, कल्याण साठे, देशमाने, जोगदंड,सुग्रीव केंद्रे ,पाटील,किशोर बनाटे,शंकर कोलमवाड, केदार, कांगणे,  दिपाली बोराडे, व इत्यादींनी परीश्रम घेतले....


चौकट ....

पालम तालुक्यातील खेडे वाडया वस्ती ताडयावर सपत्नीक सत्कार समारंभ  आयोजीत करण्यात आला पण जगावे पण कीर्तीरूपी उरावे याम्हणीप्रमाणे   पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे  यानी समाजासमोर आरसा ठेवून गौरगरीब जनतेची सेवा केली ......युवानेते अमोल रोकडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या