🌟परळी शहरातील भिमनगर येथील मुलीच्या लग्नासाठी पाच हजाराची आर्थिक मदत....!


🌟वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर यांच्या वतीने करण्यात आली आर्थिक मदत🌟              

परळी (दि.१६ जुलै २०२३) - परळी शहरातील भीम नगर येथील महादेव दामोदर साळवे यांच्या मुलीच्या लग्नास पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली असल्याची माहिती तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.           याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने विविध सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येत असून आजच्या परिस्थितीत मुलींच्या लग्नासाठी वधू पित्यास खूप अडचणींना तोंड देऊन मुलीचा विवाह करावा लागतो त्यासाठी एक सामाजिक ऋण म्हणून परळी शहरातील तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने भीम नगर येथील महादेव दामोदर साळवे यांच्या मुलीचा विवाह काल दिनांक16 /7/2023 रोजी अहमदपूर येथील किरण मंगल  कार्यालयात संपन्न झाला असून या लग्नास एक खारीचा वाटा म्हणून व मुलीच्या पित्याची अडचण लक्षात घेता पाच हजाराची मदत करण्यात आली. तसेच इथून पुढेही भीम नगर साठे नगर प्रबुद्ध नगर रमानगर इत्यादी विभागातील प्रत्येक मुलीच्या लग्नास तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने पाच हजाराची मदत करण्यात येणार असल्याची माहितीही तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब जगतकर अविनाश जगतकर धम्मा जगतकर मनोज कांबळे इत्यादीच्या हस्ते मुलीच्या वडिलास देण्यात आले असून या उपक्रमाबद्दल लग्नातील वऱ्हाडी मंडळी व पाहुणे मंडळी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले व पुढील कार्यास शुभेच्छा ही दिल्या असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती देण्यात आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या