🌟परभणीत दयावान सरकार संघटनेकडून उद्या दि.११ जुलै रोजगार मेळावाचे अयोजन....!


🌟मंगळवार दि.११ जुलै रोजी परभणीच्या अतिथी हाॅटेल येथे दुपारी ०३:३० वाजता रोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न होईल🌟 


परभणी (दि.१० जुलै २०२३) - परभणी शहरातील अतिथी हॉटेल येथे उद्या मंगळवार दि.११ जुलै २०२३ रोजी दयावान सरकार संघटने कडून रोजगार मेळावाचे अयोजन करण्यात आले आहे अशी माहिती दयावान सरकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेचे आयोजन परभणी येथील अतिथी हाॅटेल येथे आज सोमवार दि.१० जुलै रोजी करण्यात आले होते. 

यावेळी पत्रकार परिषदेत दयावान सरकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड,दयावान सरकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सरदार रघुवीरसिंघ टाक,समाजसेवक राजकुमार मनवर हे उपस्थित होते.यावेळी उद्या मंगळवार दि.११ जुलै रोजी परभणीच्या अतिथी हाॅटेल येथे दुपारी ०३:३० वाजता रोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न होईल.व तसेच दुपारी १२:३० वाजता साखला प्लाट येथील पवित्र गुरूद्बारा साहीबच्या नियोजित जागेची पाहणी व महानगर पालिकाच्या निवारा केंद्र येथे दयावान सरकार संघटनाचे संस्थापक अध्यक्ष संदिप निकुंभ यांच्या हस्ते फळ वाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे.तर दयावान सरकार संघटनाच्या वतीने आवाहण मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड,समाजसेवक राजकुमार मनवर,जिल्हाध्यक्ष रघुविरसिंग यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या