🌟नांदेड जिल्ह्यातील शिख समाजाचे प्रथम इंजिनियर स.महेन्द्र सिंघ हरी सिंघ कड़ेवाले यांचे निधन....!


🌟सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड गुरूद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी यांचे ते मोठे बंधू होते🌟 

नांदेड : शिख समाजाचे प्रथम इंजिनियर व कलंवर सहकारी कारखान्याचे एम डी. (कार्यकारी संचालक) स. महेन्द्र सिंघ हरी सिंघ कडेवाले यांचे दि 31 जूलै 2023 रोजी हैद्रावाद येथे उपचार घेतांना दवाखान्यामध्ये निधन झाले. अत्यंत विकट परिस्थिती मध्ये आपले शिक्षण पूर्ण करुन उच्च शिक्षा प्राप्त केलेले नांदेड जिल्ह्यातील शिख समाजातील ते प्रथम इंनियर होते. त्यांनी काही काळ कलंबर सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम केले व देश-परदेशात विविध साखर कारखान्यांमध्ये आपली सेवा दिली, त्यांचे हैद्राबाद मध्ये उपचार घेतांना निधन झाले आहे.

सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी यांचे ते मोठे बंधू होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा-सुन असा परिवार मागे सोडून गेले. त्याचे पार्थिव शरीर अबचलनगर कॉलनी मध्ये हैद्रबाद हून काल सोमवार दि.३१ जुलै २०२३ रोजी आणण्यात आले त्यांचे अंतीम संस्कार आज दि.०१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ०१-०० वाजता नगिनाघाट येथे होणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या