🌟चिखली मंडळात कृषिसंजीवनी सप्ताहांतर्गत शेतकर्‍यांना होत आहे मार्गदर्शन.....!


🌟मंडळ कृषि अधिकारी डी.एस.कोते,कृषि पर्यवेक्षक डी.व्ही.सिताफळे व जी.बी.इंगळे यांची प्रमुख उपस्थिती🌟


✍️ मोहन चौकेकर 

चिखली (दि.०१ जुलै २०२३) : यावर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत दि.25 जून ते 1 जुलै या कालावधीत तालुका कृषि विभागाच्या चिखली मंडळामध्ये तालुका कृषि अधिकारी श्री सवडतकर यांचे मार्गदर्शनात चिखली मंडळ कृषि अधिकारी डी.एस.कोते, कृषि पर्यवेक्षक डी.व्ही.सिताफळे व जी.बी.इंगळे यांच्या उपस्थितीत कृषिसंजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

चिखली मंडळातील सवणा, वळती, धोडप, हातणी, चिखली, गोद्री, सातगांव भू, साकेगांव, केळवद, किन्होळा, खंडाळा म या सज्जामधील सर्वच गावांमध्ये  कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकर्‍यांच्या गांवबैठका घेण्यात येत आहेत. यावेळी बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवणक्षमता तपासणे, उताराला आडवी पेरणी, टोकण पध्दतीने सोयाबीनची पेरणी, सरीवरंबा पध्दत, खतांचा योग्य वापर, तणनाशकांचा योग्य वापर, बी-बियाणे घेतांना घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच यावेळी योग्य तंत्रज्ञान असलेले साहित्य वाचनही करण्यात येत आहे.

तसेच या सप्ताहादरम्यान प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेंतर्गत प्रलंबित ई-केवायसी व बँक खाती आधार सलंग्न करण्याची कारवाई करण्यात येत आहे.या गांवबैठकांना शेतकर्‍यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चिखली मंडळामध्ये गांव बैठका यशस्वी करण्यासाठी कृषिसहाय्यक अमोल बाहेकर, पाटीलमॅडम, सविता मादनकर, विजय चिंचोले, राहुल वानखेडे, विशाल गायकवाड, शितल डुकरे, वैशाली सोलाट, प्रीती बाहेकर, योजना भागीले, मनिषा टेकाळे तसेच विविध गावचे कृषिमित्र हे परिश्रम घेत आहेत......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या