🌟पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे पाळीव जनावरांच्या लंपी त्वचारोग लसीकरणास सुरुवात....!


🌟पशुवैद्यकीय दवाखाण्यात गावचे सरपंच बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पाळीव जनावरांना लसीकरण करण्यास प्रारंभ🌟

प्रतिनिधी

पाथरी (दि.११ जुलै २०२३) :-तालुक्यातील वाघाळा येथे जनावरा मधील लंपी त्वचारोगा साठी मंगळवार ११ जुलै रोजी पशुवैद्यकीय दवाखाण्यात गावचे सरपंच बंटी पाटील यांच्या उपस्थितीत पाळीव जनावरांना लसीकरण करण्यास प्रारंभ केला.

या वेळी पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात वृक्षारोपण करुन लंपी त्वचारोग लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. या वेळी गावचे सरपंच बंटी पाटील,डॉ जाधव, पत्रकार किरण घुंबरे,गजानन घुंबरे,रमेश बिजुले,डॉ महेश घुंबरे,नवघरे,परसु मोकाशे,पप्पु घुंबरे आदी ग्रामस्थ,पशुपालक यांची या वेळी उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या