🌟उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील भयंकर घटना भाजपा आमदाराच्या नातेवाईकाने चिरडले एकाला...!


🌟गाडीवर भाजपचा झेंडा असून आरशावर आमदार प्रतिनिधी असे लिहिलेले : भयंकर घटनेतील विडियो पहा🌟

उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबादमध्ये घडलेल्या रस्ता अपघातातील एका भयंकर घटनेचा वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडीओ ज्याने बघितला त्याचे हृदय अक्षरशः पिळून निघेल हा व्हिडिओ काल रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


[या भयंकर घटनेतील विडियो पहा]

प्रथम हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये एक कार दिसत आहे.  रस्त्यावर एक माणूस पडलेला दिसतो आणि त्यानंतर कारने या व्यक्तीला गाडीच्या चाकाखाली तुडवलेच पण जेव्हा तो गाडीखाली आला तेव्हा त्याला खेचूनही नेण्यात आले.एवढेच नाही तर गाडीवर भाजपचा झेंडा असून आरशावर आमदार प्रतिनिधी असे लिहिलेले आहे तेथून जाणाऱ्या एका कार चालकाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला, ज्यामुळे ही घटना लाईव्ह रेकॉर्ड झाली.

त्यानंतर सकाळपासून हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.  हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी कारची नंबर प्लेट बघून गाडी चालवणाऱ्या सौरव शर्माला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्यासोबतची कारही जप्त केली आहे, तर मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस. पोस्टमॉर्टमसाठी पाठवले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या