🌟पुर्णा तहसील कार्यालया समोर नगर परिषदे विरोधात मोकाट जनावरांचे ठिय्या आंदोलन ?


🌟नगर परिषद प्रशासनाने हक्काचा कोंडवाडा असतांना गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहात कोंडल्याचा राग ?🌟पुर्णा (दि.१९ जुलै २०२३) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाने हक्काचा अधिकृत कोंडवाडा असतांना देखील संघटीत मोकाट जनावरांच्या कळपाला गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहात का कोंडले राग अनावर झाल्यानेच कदाचित आज बुधवार दि.१९ जुलै २०२३ रोजी संघटित झालेल्या मोकाट जनावरांनी पुर्णा तहसिल कार्यालया समोर ठिय्या आंदोलन तर केले नसावे ना ? असा प्रश्न तहसिल कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पडला.


नागरिकांना असा प्रश्न उपस्थित होणे ही साहजिकच म्हणावे लागेल कारण पुर्णा नगर परिषद प्रशासनाने नगर परिषद परिसरातील मौलाना अबुलकलाम आझाद चौक परिसरातील मौलाना अबूल कलाम उर्दू शाळेलगतच मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कोंडवाडा तसेच त्याला लागूनत मुसाफीरखाना देखील बांधलेला आहे परंतु या दोन्ही वास्तुंवर भुखंड माफीयांच्या वक्रदृष्ट्या असल्यामुळे त्यांच्या इच्छांचीपुर्ती व्हावी याकरिता नगर परिषद प्रशासनातील काही भु-माफियांचे प्यादे देखील प्रयत्नात असल्यामुळे या अधिकृत कोंडवाड्याला अक्षरशः बगल देऊन 'कावळा केला कारभारी अन् विष्ठा आली दरबारी' या उक्तीचा प्रत्यय देत नगर परिषदेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी चक्क आव देखा ना ताव देखा अश्या पध्दतीने महाराष्ट्राची लोककला सातासमुद्रापार नेणारे लोककलावंत गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू कदम गोंधळी यांच्या नावाने कोट्यावधी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या जुना मोंढा परिसरातील गोंधळ सम्राट कै.राजाराम बापू गोंधळी सांस्कृतिक सभागृहाचाच मोकाट जनावर कोंडण्यासाठी वापर सुरु केल्यामुळे कदाचित हा अवमान मोकाट जनावरांच्याही जिव्हारी लागल्यामुळेच त्यांनी आज बुधवार दि.१९ जुलै २०२३ रोजी सरळ तहसिल कार्यालय गाठून ठिय्या आंदोलना सुरुवात केली असावी ? असे आजच्या या तहसिल कार्यालया समोरील दृष्यावरून वाटत आहे....        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या