🌟परभणी जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्री.रघुनाथ गावडे यांनी सौ.आंचल गोयल यांच्याकडून स्विकारला पदभार....!


🌟या दोघाही उच्चपदस्त अधिकार्‍यांनी एकमेकांना पुढील कार्यासाठी दिल्या शुभेच्छा🌟 

परभणी (दि. २२ जुलै २०२३) : परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून रघुनाथ गावडे यांनी आज शनिवार दि.२२ जुलै २०२३ सायंकाळी मावळत्या जिल्हाधिकारी सौ.आंचल गोयल यांच्याकडून आपल्या पदाचा पदभार स्विकारला.


          परभणी जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून रघुनाथ गावडे सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी कश्या प्रकारे कर्तव्य बजावतात हे तर आगामी काळात कळेलच सौ.गोयल यांची राज्य सरकारने नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली केल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली. शुक्रवारी सायंकाळी या बदल्यांसंदर्भातील आदेश प्राप्त झाला होता. त्याप्रमाणे गावडे हे नंदूरबार सीईओ पदाचा पदभार अन्य अधिकार्‍यांना सोपवून शनिवारी सायंकाळी परभणीत दाखल झाले. त्यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात सौ. गोयल यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी स्वागत केले. त्या पाठोपाठ सौ. गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार गावडे यांना सुपूर्त केला. या दोघाही उच्चपदस्त अधिकार्‍यांनी एकमेकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या