🌟जिंतूर तालुक्यातील भोगाव ते ईटोली भागातील नागरिकांनी एकत्र येत श्रमदानातून बुजवले रोडवरील खड्डे....!


🌟रस्त्यावर झालेल्या या खड्ड्यांकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष देत : नागरिक त्रस्त🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.१२ जुलै २०२३) :- तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील असलेल्या भोगाव ते ईटोली या पूर्ण डोंगरातील रस्त्यावर पावसाळ्यापूर्वीच रोडच्या वळणावर मोठ-मोठी खड्डे पडल्याने अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशातच भोगाव देवी समोरील वळणावर मोठा खड्डा पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहणे चालवावी लागत होती. अशातच वळण रस्ता व खड्डा असल्याने वाहने बाजूने घेते वेळी वळणावर समोरून अचानक वाहन आल्यानंतर दोन्ही वाहनांना कसरतीला सामोरे जावे लागत असल्याने या प्रकरणांकडे ना लोकप्रतिनिधी संबंधित खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

शेवटी काही सुजाण नागरिक व महिला, पुरुषांनी आपले वाहन बाजूला करून तो खड्डा श्रमदानातून बुजविला वाहनधारकांना होणारा त्रास कमी केला परंतु असे बरेच खड्डे भोगाव ते ईटोली रोडवर आणखीन शिल्लक आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व सुस्तावलेले अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची नागरिकात चर्चा ऐकावयास मिळते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या