🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट/ हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟शरद पवार बैठकीत वेगळे व बाहेर वेगळे बोलायचे छगन भुजबळांचा शरद पवारांवर खळबळजनक आरोप🌟

✍️ मोहन चौकेकर

* पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर; कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शरद पवार ; महाराष्ट्रातील ताज्या राजकीय फोडाफोडीमुळे या कार्यक्रमाकडे लागले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष, कॉग्रेसने पुरस्कारास केला विरोध.

* भारतातील सेमीकंडक्टर प्रकल्पाला धक्का; फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला

* जायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव; मराठवाड्यातील प्रमुख धरणात 33.48 टक्केच पाणीसाठा शिल्लक

* शिमल्यात मुसळधार पावसाचा कहर, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे घरे आणि दुकानांचे सामान वाहून गेले

* कृषी पदवीच्‍या नोंदणीस 16 जुलैपर्यंत मुदतवाढ! प्रवेश वेळापत्रकात बदल

* नव्या संसद भवनाप्रमाणे राज्यात नवे विधीमंडळ तयार होणार ; राहुल नार्वेकर CM शिंदेंकडे देणार प्रस्ताव..

* शरद पवार बैठकीत वेगळे व बाहेर वेगळे बोलायचे छगन भुजबळांचा शरद पवारांवर खळबळजनक आरोप

* राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या स्थगितीवर आज मंगळवार रोजी होणार सुनावणी, स्थगिती कायम राहणार,की स्थगिती उठणार या कडे संपूर्ण राजकारण्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष

* बीसीसीआय देणार रिंकू- ऋतुराजला संधी! आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियातून खेळणार.

* "MP मध्ये बारावीला 70 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप"

* Mahindra & Mahindra इलेक्ट्रिक वाहन बाजारात 5000 कोटींची गुंतवणूक करणार, 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच होणार

* माझा पुतण्या जेव्हा मला थांबायला सांगेल तेव्हा मी थांबेल असे म्हणत नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांना डिवचले 

* शालेय शिक्षणात महाराष्ट्राची कामगिरी खालावली: महाराष्ट्र राज्याला 1000 पैकी 583 गुण, देशातील टॉप-टेनच्या यादीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा 'पीजीआय' अहवाल जाहीर.

* शेअर बाजार: सेन्सेक्स 63.72 अंकांनी वाढून 65,344.17 अंकांवर बंद, तर निफ्टी 36.30 अंकांनी वाढत 19,368.10 अंकांवर बंद.

* ह्युंदाई एक्सटर लॉंच: किंमत 5.99 लाख, सर्व प्रकारांमध्ये 6 एअरबॅग्ज देणारी भारतातील पहिली मिनी एसयूव्ही असल्याचा दावा; टाटा पंचशी होणार स्पर्धा.

* शिवसेना हे नाव मी कोणाला घेऊ देणार नाही --- उद्धव ठाकरे ; उद्धव ठाकरे यांनी तुकडोजी महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन. 

* महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी, शिवसेनेच्या गटाला 'शिवसेना' हे नाव व 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी.

* पावसाचा यलो अलर्ट: कोकणसह विदर्भालाही आज पावसाचा यलो अलर्ट, कोकण भागात 10 ते 13 जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज.

* महाराष्ट्रात वाढतेय गुन्हेगारी: राज्यात हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ; हत्याकांडाच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुणे शहरात, ठाणे आणि नागपुरात हत्याकांडाच्या घटनांवर नियंत्रण.

* सोन्याचे कालचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 54450 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 59410 रुपये,

* शरद पवारांची अवस्था उद्धव ठाकरे यांच्यासारखीच होईल, गिरीश महाजनांची बोचरी टीका.

* लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पार्थ पवार असा सामना रंगेल का ? यावर आमदार रोहित पवार यांचे उत्तर.

* "नाही रंगणार. मी तुम्हाला विधानसभेचं पण आत्ताच सांगतो, बारामतीच्या विधानसभेत फक्त आणि फक्त अजितदादाच जिंकू शकतात. बाकी कुणीच तिथं जिंकू शकत नाही. राहिला प्रश्न लोकसभेचा तर बारामतीची जनता ही हुशार आहे. असे रोहीत पवार म्हणाले"

* शिवसेना हे पक्षाचे नाव माझ्यासोबतच राहील -- उद्धव ठाकरे.*

* शिवसेना हे पक्षाचे नाव माझ्यासोबत राहील. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले होते. ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही. नाव देणं हा निवडणूक आयोगाचा आधिकारच नाही. निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाचे नाव माझंच आहे आणि ते माझ्याकडेच राहील.

* निवडणुकांदरम्यान नियमांचे पालन होत आहे की नाही, ते पाहणे त्यांचे काम आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा त्यांना अधिकार नाही."-शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे*

* जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत पार्थ साळुंखे याची सुवर्णपदकाची कामगिरी.

* पार्थ सुशांत साळुंखेने भारतासह आता महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.आयर्लंड येथील लिमरीक येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत पार्थ साळुंखे याने सुवर्णपदकाची जागतिक कामगिरी करून तो जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे.

* पार्थ फक्त एवढ्यावर थांबला नाही तर दुहेरीमध्येही त्याने भारताला पदक मिळवून दिले आहे. मिश्र दुहेरी गटात पार्थ बरोबर हरियानाची रिद्धी फोर या दोघांनी मिळून कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे आता पार्थने भारताला जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकून दिली आहेत.

* नाशिकमधील सिन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजितदादांना पाठिंबा जाहीर*

* आपण विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांना पाठिंबा देत असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. पवार साहेब यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. पण अजितदादा हे उगवते सूर्य आहे.....

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या