🌟जिंतूर येथील गोरक्षक परमेश्वर स्वामी संदीप महाराज यांचा गोरक्षक महासंघ पुसद तर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरव....!


🌟यावेळी महाराष्ट्रातील पाचशे गोरक्षक उपस्थित होते🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

पुसद येथे गोशाळा महासंघ महाराष्ट्र गोरक्षण स्थळे स्मारक समिती पुसद्वारा पूस नदी तीरावर गोरक्षण स्थळी पूजन करण्यात आले गजानन महाराज मंगल कार्यालयात राज्यातील गोरक्षक क्षेत्रात काम करणाऱ्या गोरक्षकांचा गोशाळा ट्रस्ट संचालकांचा रविवारी सत्कार करण्यात आला त्यावेळी जिंतूर तालुक्यातील परमेश्वर स्वामी व संदीपभाई शर्मा या दोन गोरक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील पाचशे गोरक्षक उपस्थित होते.

त्यावेळी महाराष्ट्रातील यावेळी अध्यक्ष पदावरून श्री एकबोटे ही बोलत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुसद जिल्हा संघचालक डॉक्टर पंकज जयस्वाल शेखर मुंदडा पुणे (अध्यक्ष सेवा आयोग), सुनील मानसिंगा नागपूर (सदस्य कामधेनू आयोग भारत सरकार), अशोक जैन मुंबई (अध्यक्ष महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा समिती महाराष्ट्र शासन), अंकुश रामगडे , संजय भोसले, नेरकर उद्धव ,शाम भारती महाराज, सुभाष जैन अकोला, मनीष वर्मा, नारायण शिंदे महाराज, आयोजक डॉक्टर सुनील सूर्यवंशी अमरावती, नेहरू महाराज, डॉ. मार्कंडेय आदी उपस्थित होते .गोमाता ही कृषीचा आधार आहे . गोमाता नामशेष झाली  तर कशी संपेल. अन्नधान्य पिकणार नाही शेती बंजर  होईल लोक भुकेने मरतील एवढे सगळे प्रमाद,गोहत्तेने घडतील त्यामुळे गोहत्या वाचविणे हा राज्य सरकारचा कार्यक्रम असावयास पाहिजे असे मत त्यांनी मांडले यावेळी नारायण महाराज यांनी गोरक्षकावरील अत्याचार थांबावावे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावी अशी मागणी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या