🌟बुद्धविहार पूर्णा या ठिकाणी श्रावण पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना वृक्षारोपण व सत्कार समारंभाचे आयोजन.....!


🌟याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कामगार अधिकारी विद्याधर माणगावकर परभणी यांची उपस्थिती राहणार आहे🌟

बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी श्रावण पौर्णिमेनिमित्त दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी अखिल भारतीय भिक्कु संघाचे महासचिव भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वर्षावास अधिष्ठान धम्मदेशना वृक्षारोपण व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 5:30 वाजता परित्राण पाठ व सूत्र पाठ घेण्यात येणार आहे.दुपारी ठीक 12:30 वाजता सामूहिक बुद्ध वंदना पूजा पाठ वृक्षारोपण व धम्मदेशना सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कामगार अधिकारी परभणी विद्याधर माणगावकर जिल्हा कृषी अधीक्षक विजय कुमार लोखंडे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना विलास खिल्लारे निवृत्त मुद्रांक उपजिल्हाधिकारी वसंत सातदिवे पोलीस निरीक्षक पूर्णा प्रदीप काकडे आदींची उपस्थिती असणार आहे.वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा व धम्म सेवेत करत असलेली महिला मंडळ यांनी केले आहे कार्यक्रमानंतर उपासिका गंगासागर अशोक पाटील नांदेड यांच्याकडून भिक्खू संघास ची वरदान व खीर दान करण्यात येईल......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या