🌟अमरावती पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांने पुण्यात पत्नी पुतन्यावर गोळ्या झाडून स्वतःवरही झाडली गोळी....!


🌟पुण्यातील बाणेर परिसरात आज भल्या पहाटे ०४-०० च्या सुमारास घडली दुर्दैवी घटना🌟 

पुणे (२४ जुलै २०२३) : अमरावती पोलिस दलात सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत पोलिस अधिकारी भरत गायकवाड यांनी आज सोमवार दि.२४ जुलै २०२३ रोजी भल्या पहाटे ०४-०० वाजेच्या सुमारास स्वतःच्या परवाना असलेल्या खाजगी रिव्हाल्वरने आपल्या पत्नीसह पुतण्याही गोळी झाडून खून केल्यानंतर त्यांनी स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपवल्याची हृदयविदारक घटना घडल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.


पुण्यातील बाणेर परिसरात आज भल्या पहाटे ०४-०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे अमरावती पोलिस दलात कार्यरत सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड या अधिकाऱ्याने पत्नी मोनी भरत गायकवाड वय ४४ वर्षे,पुतण्या दिपक गायकवाड वय ३५ वर्षे अशी गोळी झाडून खून करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. तर भरत गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिस स्थानकाचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते ते सुट्टीसाठी नुकतेच पुण्यात आले होते.

ही हत्या करण्याचं आणि त्यानंतर आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या