🌟फेसबुक की फेकबूक ? अब....ब चक्क उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या नावाने उघडले बोगस अकाऊंट ?


🌟गंगाखेड पोलिस स्थानकात उपविभागीय अधिकारी डापकर यांनी नोंदवली रितसर लेखी तक्रार🌟


परभणी (दि.०१ जुलै २०२३) - सोशल मिडिया अर्थात फेसबुक इन्स्टाग्रामवर नामांकीत व्यक्तींच्या नावावर बोगस अकाऊंट ओपन करून त्या अकाऊंट वरून वादग्रस्त पोस्ट टाकण्यासह संबधातील व्यक्तींकडून पैश्याची मागणी करण्याचे देखील गंभीर प्रकार वाढल्यामुळे अश्या प्रकारे नामांकीत व्यक्तींच्या नावावर 'फेक अकाऊंट' उघडणारी टोळी कार्यरत आहे की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्यात 'सायबर क्राईम सेल' अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

असाच गंभीर प्रकार परभणी जिल्हा प्रशासनात कार्यरत अधिकारी तथा गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी श्री.जिवराज डापकर यांच्या सोबतही घडल्याची घटना काल शुक्रवार दि.३० जुन २०२३ रोजी उघडकीस आली असून उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या नावाने एका अज्ञात भामट्याने चक्क फेसबुक या सोशल मिडिया साईटवर बोगस अकाऊंट उघडल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी काल शुक्रवार दि.३० जुन २०२३ रोजी गंगाखेड पोलिस स्थानकात रितसर लेखी तक्रार नोदवली असून त्यांनी तात्काळ या गंभीर प्रकाराची चौकशी कायदेशीर कारवाईसह हे बोगस फेसबुक अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे.

या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून सोशल मिडियांचा वापर करणाऱ्या नागरिकांनी या प्रकारामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे......  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या