🌟परभणीचे माजी नगराध्यक्ष बाबुराव मठपती यांचे 94 व्या वर्षी निधन.....!


🌟त्यांच्या पश्चात मुलगा विजय मठपती यांच्यासह 2 मुले, 2 मुली, नात,नातवंडे,पतवंड असा मोठा परिवार आहे🌟

परभणी : तब्बल 30 वर्ष नगरसेवक व नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष राहिलेले जुन्या काळातील लोकप्रिय नेते बाबुराव मठपती यांनी आज वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजाराने त्यांचे शहरातील एका खाजगी रुग्णालयात आज शनिवारी (२९, जुलै) रात्री निधन झाले.

दरम्यान, रविवारी (३० जुलै) सकाळी 11.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी, सकाळी 9.30 वाजता श्री.रंगनाथ महाराज मंदिरासमोरील (श्री वैष्णवी मंगल कार्यालयाच्या मागे) त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात येईल. त्यांच्या पश्चात मुलगा विजय मठपती यांच्यासह 2 मुले, 2 मुली, नात, नातवंडे, पतवंड असा मोठा परिवार आहे.

     गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वस्थ मुळे शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान शनिवारी रात्री 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. विशेष म्हणजे तब्बल 30 वर्ष नगरसेवक राहिलेल्या बाबुराव मठपती यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. ते तब्बल 10 वर्ष उपनराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर 1991 ते 1994 असे 4 वर्ष नगराध्यक्ष होते. सुरुवातीला 'शेकाप' मधून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानंतर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

   एवढेच नव्हे तर *वीरशैव लिंगायत समजाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य देखील खूप मोठे आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा पुढाकार होता. त्यांच्याच नेतृत्वात अनेक वर्ष समाजाचे कार्य होत राहिले. त्यामुळेच त्यांना पुणे, लातूर आणि बीड या ठिकाणी मोठ मोठ्या मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

    त्यांच्या जाण्याने समाजासह शहरवासियांचे देखील खुप मोठे नुकसान झाले. एक चांगला पुढारी, समाजसेवक, राजकारणी व मार्गदर्शक गमावल्याची भावना शहरातील राजकीय, समाजीक, धार्मिक आणि संस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत.....


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या