🌟चंद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणाने नांदेड येथील विष्णुपूरीतील विद्यार्थ्यांनी घेतले बळ...!


🌟नांदेड येथील विष्णुपूरीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उड्डाणाचा अनुभवला वैज्ञानिक प्रवास🌟

नांदेड (दि.14 जुलै 2023) :- चंद्रयाण-3 च्या उड्डाणाची उलटगणती जशी सुरु झाली तशी विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता व उत्कंठा यशस्वी उड्डाण होईपर्यंत शिगेला पोहचली होती. ज्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्टेशनवरुन चंद्रयान-3 अवकाशात झेपावले त्या लॉचिंग पॅड व इस्त्रो सेंटरला या शाळेतील दोन विद्यार्थिनींना प्रत्यक्ष शैक्षणिक सहली अंतर्गत भेट देण्याची संधी मिळालेली होती. यामुळे या शाळेतील इतर मुलांच्या मनातही चंद्रयान-३ बद्दल कमालीची उत्सुकता होती. केंद्र शासनाने हे उड्डाण विद्यार्थ्यापर्यंत पोहचावे व याला साक्षीदार होता यावे यासाठी थेट प्रक्षेपणाचा निर्णय घेतला. या थेट प्रक्षेपणाची दुहेरी अनुभुती विष्णुपूरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसह इतर शाळांनाही घेता आली शाळेतील विद्यार्थ्यांना या उड्डाणाला साक्षीदार होता यावे यासाठी शाळेने हे थेट प्रक्षेपण मोठया स्क्रिनद्वारे विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदतर्फे शालेय विद्यार्थ्यांना इस्त्रो केंद्राला भेट देता यावी यासाठी एक विशेष उपक्रम घेतला होता. जिल्ह्यातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांची परिक्षेद्वारे निवड केली होती. इयत्ता 5 वी  ते 8 वी या वर्गातील निवडक 50 विद्यार्थ्यांमध्ये 27 मुली व 23 मुले यांची निवड करण्यात आली. विष्णुपूरी येथील जिल्हा परिषद शाळेतील कु. सृष्टी सोनटक्के व अश्लेषा केंद्रे या दोन विद्यार्थीनी पात्र झाल्या. ही प्रत्यक्ष अनुभुती या विद्यार्थिनीसमवेत इतर मुलांनाही घेता यावी यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे यांनी चंद्रयान-3 च्या औचित्याने हे प्रक्षेपण शाळेत मुलांना दाखविण्याचे सूचित केले होते. त्यानुसार हा अभिनव उपक्रमांतर्गत राबविला गेला. यातून इतर मुलांच्या मनात विज्ञानाचा विश्वास निर्माण करण्यात यश आले.

“नांदेड जिल्हा परिषदेने मागील परिक्षेद्वारे पात्र ठरलेल्या 50 विद्यार्थ्यांना मागील मे महिन्यात श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या संशोधन केंद्राला भेट देण्याची संधी दिली होती. या भेटीमुळे वैज्ञानिक दृष्टीकोनातून हे केंद्र व आपल्या देशाचे संशोधन व प्रगती आम्हाला अनुभवता आली. ज्या केंद्राला आम्ही भेट दिली होती. प्रत्यक्ष पाहणी केली होती तेथून चंद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासानेही अप्रत्यक्ष झेप घेतली आहे” अशी प्रतिक्रिया या शाळेतील विद्यार्थीनी अश्लेषा केंद्रे व सृष्टी सोनटक्के या विद्यार्थीनीनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या