🌟नांदेड येथील जेष्ठ पत्रकार तथा समाजसेवक सरदार रवींद्रसिंघ मोदी यांना 'नेशनल इंटीग्रेशन एक्सीलेंस अवार्ड 2023' प्रदान...!

 


🌟सरदार जितेन्द्रसिंघ शंटी,एथलीट जोरावरसिंह, दिव्या गोयल, प्रशांत नेमा,इमरान अहमद,वरून सूरी सम्मानित🌟


नई दिल्ली (दि.25 जुलै 2023) : देशाची राजधानी दिल्ली येथे मानव अधिकार आणि सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था इंटरनेशनल इक्विटेबल ह्यूमन राइट्स सोशल कॉन्सिल नई दिल्ली संस्थेच्या विद्यमानाने सुरु करण्यात असलेल्या राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारांचे प्रदान दि. 22 जुलाई रोजी सायंकाळी दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशन सभागृहात झाले. कार्यक्रमात पदमश्री पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते सरदार जीतेन्द्रसिंघ शंटी, नांदेडचे पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी, पोलीस अधिकारी प्रशांत नेमा, रोप एथलीट जोरावरसिंघ यांच्या सह विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचे राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने गौरव करण्यात आले. पुरस्कार प्रदान करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि वकील श्री रोमेश गौतम, पोलीस अधिकारी प्रशांत नेमा, भारतीय लोकमत राष्ट्रवादी पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पंकज कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्जवलन करून करण्यात आली इंटरनेशनल एक्विटेबल ह्यूमन राइट कौंसिल दिल्ली संस्थेचे प्रमुख व वरिष्ठ मिडिया कर्मी श्री संजय सिन्हा यांनी मीडिया आणि आणि राष्ट्रीय संयोजक संपादक अरुण बर्मन यांनी यावेळी सर्व अतीथींचे सत्कार केले. 


कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना संजय सिन्हा म्हणाले की साधावस्थेत देशाची वर्तमान परिस्थिती चिंताजनक अशी आहे. मानवता होत चाललेला दुरावा आणि राजकीय उद्देश्याने सामाजिक सौहार्द बिगडविण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर आपण सलोखा निर्माण करण्यास मदत करू या. याच उद्देश्याने आज संस्थेच्या वतीने समाज निर्माण क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून इंटरनेशनल इक्विटेबल ह्यूमन राइट्स सोशल कॉन्सिल संस्थेतर्फे नेशनल इंटीग्रेशन एक्सेलेंस अवार्ड 2023 पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. यासाठी देशपातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करतांना आनंद होत आहे. संस्थेचे हे तीसरे कार्यक्रम असून यंदाच्या पुरस्कारासाठी मागील कोविड संक्रमण काळात योगदान देणाऱ्या विभूतींचीही प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. त्यात कोविड काळात हजारोंच्या संख्येत मृतांच्या देहाचे अंत्यसंस्कार करणाऱ्या श्रीमान जीतेन्द्रसिंह शंटी   यांच्या सह भारतीय रोप जंप एथलीट जोरावर सिंह, पत्रकार रवींद्रसिंघ मोदी (नांदेड महाराष्ट्र), आरजे राहुल मकीन, पारा एथलीट दिव्या गोयल, योगा इंस्ट्रक्टर मॉडल श्रेया राठौर देव, ग्लोबल एजुकेटर रूपम मुखर्जी, तबला वादक पंकज बनाई, चित्रपट निर्देशक रमेश जुगरान, न्यूज़ एंकर निधी सिंह, पत्रकार लोकेश वर्मा, कवियत्री काव्यमणि बोरा (आसाम), सूफी गायक समीर नियाजी, मनीष सांखला, अरुंधति मिश्रा, जान्हवी काक ती, रविंद्र चहल, उर्दू पत्रकार आबिद अहमद, योगा इंस्ट्रक्टर श्रेया राठौर, अभिनेत्री निशा सिंह, समाज सेवी मुनींद्र नाथ(आसाम), मधुसूदन मेदी यांना पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. 


इंटरनेशनल इक्विटेबल ह्यूमन राइट्स सोशल काउंसिल संस्थाचे राष्ट्रीय संयोजक आणि "प्रज्ञा मेल" वर्तमान पत्राचे संपादक श्री अरुण बर्मन यांनी कार्यक्रमाचे स्वरुप आणि पुरस्कार प्राप्त लोकांची व्याप्ति स्पष्ट केली पुरस्कार विजेता पदमश्री जीतेन्द्रसिंघ शंटी यांनी आपल्या संबोधनात कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले. श्री शंटी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार स्वीकरतांना खरोखरच आनंद होत आहे. कोविड काळात मला सामाजिक कार्य करून लोकांची मदत करण्याची संधी मिळाली. केंद्र शासनाने मला पदमश्री देऊन माझ्या कार्याचे सम्मान केले. मला वाटते की प्रत्येक मानवाने एकदुसऱ्याची मदत करण्याची भावना बाळगली पाहिजे. आपण एकमेकांची मदत करून चांगल्या राष्ट्राचे निर्माण करू शकतो पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांनी सरदार जीतेन्द्रसिंघ शंटी यांना हजुरसाहिब नांदेड येण्याचे आमंत्रण दिले त्यावर शंटी म्हणाले की, नांदेड येथे एखादे कार्यक्रम आयोजित केल्यास माझी येण्याची तयारी आहे.

 राष्ट्रीय एकात्मता पत्रकारिता पुरस्काराने सम्मानित झाल्यानंतर स. रवींद्रसिंह मोदी यांनी आयोजनकर्त्यांचे आभार मानले. पत्रकारितेसाठी पुरस्कार स्वीकारल्यानंतर स. रवींद्रसिंघ मोदी यांचे सर्वस्तरावरून अभिनन्दन करण्यात येत आहे. रवींद्रसिंघ मोदी हे मागील तीस वर्षापासून पत्रकारितेत सक्रिय सेवा देत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात सतत तीस वर्षें दिलेल्या योगदानासोबत सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी सतत कार्य केले आहे. विशेष म्हणजे रवींद्रसिंह मोदी यांनी वर्ष 2008 मध्ये पार पडलेल्या गुरुतागद्दी त्रिशताब्दी सोहळा दरम्यान अहोरात्र पत्रकारिता आणि सामाजिक सेवा केली होती. त्यांनी विविध दैनिकात त्यांनी जिल्हा प्रतिनिधी व उपसंपादक म्हणून सेवा केली आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याने त्यांचे मित्र परिवार, पत्रकार संघठन व समाजस्तरावर कौतुक होत आहे.....

फोटो कैप्शन : 

दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशन सभागृहात डॉ रोमेश गौतम, संजय सिन्हा, अरुण बर्मन यांच्या तर्फे प्रमाणपत्र, ट्रॉफी, तिरंगा देऊन पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांना पुरस्कृत करण्यात आले. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या