🌟आमदारांचा महावितरणाला बसला शाब्दीक 'शॉक' अखेर चार ​तासांनी वीजपुरवठा सुरू.....!


🌟लिमला फाटा येथील प्रकार : आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडसावले🌟


पुर्णा (दि.२० जुन २०२३) :- गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे एका शासकीय कार्यक्रमासाठी पूर्णा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळताच मौजे.कमलापूर,लिमला, दस्तापूर आणि मजलापूर येथील ग्रामस्थांनी लिमला फाटा येथे त्यांची गाडी अडवून वीजेच्या लंपडावाची माहिती दिली. वीजेमुळे पाणी नाही आणि पाण्यामुळे पिके नाहीत, अशी कैफियत मांडली. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 'बत्ती गुल मीटर चालू' हाही प्रकार सांगितला. 

ग्रामस्थांची हि तक्रार शांतपणे ऐकून घेतलेल्या संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भ्रमणध्वीनद्वारे चांगलीचं कानउघाडणी केली 'मी इथे रस्त्यावर उभा आहे. लोकांनी माझी गाडी अडवली आहे. पुढच्या पंधरा मिनिटात येथे पोहोचा' असा आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला. तसेच आमदारांचे कार्यतत्पर स्वीय सहाय्यक बाळासाहेब पवार यांनीही संबंधित वायरमन, ठेकेदार, अभियंता यांना घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे महावितरणची धावपळ झाली.

पुढे काही वेळात उपकार्यकारी अभियंता शामकांत खोडपे, सहाय्यक अभियंता मंगेश खरगे, वायरमन साहेबराव ठाकरे पोहोचले. त्यानंतर शासकीय नियमांवर बोट ठेवत रोखठोक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी चांगलीच कानउघाडणी करून पुढच्या चार तासात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर‌ सर्व यंत्रणा कामाला लागली. आजच काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर आ.डॉ.गुट्टे पुढील कार्यक्रमासाठी पूर्णाकडे रवाना झाले. 

मात्र, परतीच्या प्रवासात आ.डॉ.गुट्टे पुन्हा लिमला फाटा येथे थांबले. काम पूर्ण झाल्याची खात्री करून घेतली. शेतकऱ्यांशी भेटले. आपुलकीने विचारपूस केली. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना समाधान वाटले. दरम्यान, कोणतीही अडचण किंवा समस्या आल्यास अर्ध्या रात्री फोन करा. मी तुमचा सेवक आहे. तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्यामुळे मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे‌ आहात, असाही भावनिक संवाद आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थितांशी साधला. 

यावेळी मित्रमंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर, प्रल्हाद कोळेकर, कैलास शिंदे, गणपतराव देशमुख, नरेंद्र देशमुख, सचिन देशमुख, चेतन सूर्यवंशी, परमेश्वर जगताप, परमेश्वर जगताप, बाबाराव सूर्यवंशी, बालासाहेब गव्हाणे, सोपान देशमुख, बाबू वानखेडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🌟वीज आली,आनंद वाटला...

गेली अनेक दिवस या भागतला वीजपुरवठ खंडीत होता. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, तरीही प्रशासन दखल घेत नव्हते. आज आमदार साहेबांनी खूप मोठी अडचण दूर केली. त्यांच्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला याचा आनंद वाटतो, अशी भावना मौजे.कमलापूर येथील ग्रामस्थ शेतकरी प्रल्हाद कोळेकर यांनी व्यक्त केली. 

🌟...तर 'बत्ती गुल मीटर चालू' खपवून घेणार नाही :-

शेतकऱ्यांना पिकांसाठी वीज अत्यंत गरजेची आहे, याची जाणीव महावितरणला असली पाहिजे. शेती व गावठाणास नियमानुसार आजही वीजपुरवठा होत नाही. तक्रार आली तरीही प्रशासन जर ऐकत नसेल, तर त्यांना समजेल त्याचं भाषेत आम्हीही उत्तर देवू. इथून पुढे गंगाखेड विधानसभा कार्यक्षेत्रात 'बत्ती गुल मीटर चालू' असले प्रकार खपवून घेणार नाही, असाही इशारा आ.डॉ.गुट्टे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या