🌟जागतिक योग दिन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाषराव जावळे तर सचिव पदी मोहन गंधर्व यांची निवड...!


🌟या बैठकीत योगासन स्पर्धा,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी,स्टेडियमवर सामुदायिक कार्यक्रम घेण्याचे ठरले🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

परभणी (दि.१३ जुन २०२३) - येथे जागतिक योग दिन उत्सव समिती च्या वतीने दरवर्षी २१ जुन २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो याबाबत रविवार दि.११ जुन २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत जागतिक योग दिन उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुभाषराव जावळे तर सचिव पदी मोहन गंधर्व यांची एकमताने निवड करण्यात आली.

                      या बैठकीत योगासन स्पर्धा,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी,स्टेडियमवर सामुदायिक कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.या बैठकीत सुभाषराव जावळे,कृष्णा कवडी, मोहन गंधर्व, आशिष लोया,गजानन चौधरी, रामविलास लड्डा,आनंद कुलकर्णी, टिकाराम कदम,दिवाकर जोशी,अशोकराव शेलगावकर,डॉ.धीरज देशपांडे, डॉ रवी भंडारी, डॉ सौ.जवादे,डॉ दीपक महिंद्रकर, डॉ शेळके, अनिल बडगुजर, गणेश पांचाळ, बाबुराव वसेकर, अरुण पाठक, प्रशांत जोशी उपस्थित होते.

               परभणी येथील निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, योग साधना केंद्र, जिल्हा क्रीडा भारती, अखिल भारतीय योग महासंघ, परभणी योग संघटना, मुक्ताई योग संघटना, सत्य साई योग मंडळ, पतंजली योग संस्था, आर्ट ऑफ लिविंग,आरोग्य वर्धिनी योग शिक्षक संघ जिल्हा-परभणी आदी योग संस्था व संघटनांचे प्रतिनिधी सदर योग महोत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार जागतिक योग दिन महोत्सव साजरा करण्याचे या बैठकीत ठरले आहे. यासाठी योग शिक्षक यांच्या कार्यशाळेचे दि १५,१६ व १७ जून रोजी आयोजन केले आहे. परभणी व जिल्ह्यातील ज्या योग शिक्षकांना कार्यशाळेत सहभाग घ्यायचा आहे, अशा योगशिक्षक यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या