🌟दिव्यांग तपासणी कामात मनमानी करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करून कडक कार्यवाही करा...!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी🌟


परभणी (दि.२३ जुन २०२३) - जिल्ह्यातील दिव्यांगांना तपासणी करून UID कार्ड देण्याचे काम सध्या सुरू असून या उपक्रमात दिव्यांगाची तपासणी करणारे परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मनमानी करत असून त्याचा नाहक त्रास जिल्हाभरातून येणाऱ्या दिव्यांगांना होत आहे. दिव्यांग तपासणी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळासह प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांची भेट घेऊन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

दिव्यांगांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात ८.३० ते त्या दिवशी उपस्थित असलेल्या शेवटच्या दिव्यांगाची तपासणी पूर्ण होई पर्यंत संबंधित डॉक्टरांनी तपासणी स्थळी उपस्थित रहावे असे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही डॉक्टर दोन ते तीन तास लेट येतात व तपासणी करणारे डॉक्टर, एक्स रे तंत्रज्ञ व नेत्र रोग तज्ञ १२.३० वाजता तपासणी अर्धवट सोडून निघून जात असल्याने दिव्यांगांना वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे सकाळी लवकर तपासणीसाठी येणाऱ्या दिव्यांगांना दोन ते तीन दिवस सारख्या चकरा माराव्या लागतात त्याच बरोबर शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी साठी येणाऱ्या कर्णबधिर दिव्यांगासाठी असलेल्या बेरा टेस्टसाठी कायमस्वरुपी ऑडियोलोजिस्ट नसल्याने कर्णबधिर असणाऱ्या दिव्यांगाच्या तपासण्या पूर्ण होत नाहीत या बाबत अनेक दिव्यांगांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे केली आहे या विषयी जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून कामात मनमानी करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी असे ही या निवेदनात म्हणाले आहे

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर चिटणीस वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, ॲड सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, उद्घव गरुड, बाळा नरवाडे, शेख बशीर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या