🌟नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांना इंटरनॅशनल ह्युमन राईट्स पुरस्कार प्रदान.....!


🌟सामाजिक कार्यकर्ते स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव या पदावर कार्यरत आहेत🌟


नांदेड (दि.०२ जुन २०२३) - हुजूर साहीब नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तसेच बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांना इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचा २०२३ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते स.मनबीरसिंघ ब्रिजपालसिंघ ग्रंथी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव व बाबा फतेहसिंघसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच गंगाखेड विधानसभेचे निरीक्षक यांच्या उत्तम कार्याची दखल घेत इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशन यांनी ग्रंथी यांना 2023 चा पुरस्कार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश दलजित कौर जज, त्रिशिला जाधव राष्ट्रीय अध्यक्ष शांतीदूत परिवार, कमल नळगे, अ‍ॅड.आसिफ, नयीमखान राष्ट्रीय सचिव इंटरनॅशनल ह्युमन राईट्स कमिशन या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयतील बचत भवन येथे पार पडला......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या