🌟पुर्णा शहरात सर्वत्र कोट्यावधी रुपयांंची निकृष्ठ विकासकामे अलंकार नगरात मात्र नाल्यांचा अभाव...!


🌟परिसरात नाल्यां अभावी सर्वत्र घाणीचे साम्राज्य नागरिकांच्या आरोग्यावर घाव🌟 


पुर्णा (दि.०५ जुन २०२३) -
पुर्णा शहरातील अत्यंत उच्चभ्रू व सुशिक्षित नागरिकांच्या वसाहती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलंकार नगर,आदर्श कॉलणी, बोर्डीकर प्लॉटींग परिसरात एकीकड नाल्याच नसल्याने सांडपाणी व ईतर नाल्यांचे पाणी तुंबल्याने परिसरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असून केवळ या पाण्याला वाट नसल्याने जागोजागी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकड शहरातील विविध प्रभागांमध्ये करोडो रुपयांची सिमेंट रस्तें/सिमेंट नाल्यांची बोगस विकासकामांचा अक्षरशः सपाटा सुरू आहे यातील अनेक काम मनुष्य रहीत शेतवसाहतीत असल्यामुळे नागरीकांत संताप व्यक्त होत आहे.


सदर वसाहतीतील नागरिकांनी वेळोवेळी नगर परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे ह्या विषयी लेखी तक्रार करूनही प्रशासन मात्र याप्रकरनी सुस्त असल्याचे चित्र आहे, जागोजागी घाण पाण्याची डबकी साचल्याने वाहतुकीस अडथळा तर होतोच आहे, तर प्रचंड प्रमाणात डास वाडल्याने डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजार बळावले आहेत, या प्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारी यानी तात्काळ कार्यवाही करत या भागात तात्काळ नाल्याची कामे सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे, अन्यथा आम्ही सारेजण नगर परिषदेसमोर उपोषण करू असाही इशारा ह्या भागातील नागरिकांनी दिला आहे.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या