🌟सेलू येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश सुरू....!


 🌟वसतिगृह प्रवेशासाठी १५ जुलै २०२३ पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन🌟 

परभणी (दि.१४ जुन २०२३) : सेलू शहरातील बाहेती मंगल कार्यालयाजवळ सारंगी गल्ली येथे अल्पसंख्यांक समाजाताल उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना वसतिगृह प्रवेशासाठी १५ जुलै २०२३  पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वसतिगृहाचे प्राचार्य यांनी केले आहे. 

या वसतिगृहामध्ये मध्ये १०० मुलींच्या निवासाची व्यवस्था आहे. यापैकी ७० टक्के जागा अल्पसंख्यांक समाजातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी मुलींसाठी आरक्षित असणार आहेत. तर उर्वरित ३० टक्के जागा बिगर अल्पसंख्याक मुलीकडून शासनाच्या प्रचलित आरक्षणानुसार भरण्यात येणार आहेत. खुल्या व इतर प्रवर्गातील मुलींच्या प्रवेशाकरिता प्रति सत्र २ हजार ८५० रुपये इतके निवासी शुल्क आकारण्यात येणार आहे. वस्तीगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलींना जेवण, नाश्ता आदी खर्च स्वतः करावा लागणार आहे. तसेच शासन निर्णयानुसार आहार भत्ता योजनेअंतर्गत अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी तालुकास्तरीय मासिक भत्ता  ३ हजार रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्यात येईल. 

येथील वसतिगृह प्रवेशासाठी अल्पसंख्यांक मुलींचे शासकीय वसतिगृह सेलूचे अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या