🌟प्रादेशिक उपआयुक्त समाज कल्याण औरंगाबाद विभागातील निवासी शाळेतील शिक्षकांच्या गुणवत्तावर्धक परीक्षा संपन्न...!

     


🌟अशा पद्धतीच्या परीक्षा प्रथमच  घेण्याचा अभिनव उपक्रम औरंगाबाद विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे🌟

औरंगाबाद : सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत समाज कल्याण खात्याच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण औरंगाबाद विभाग यांच्या अधिनस्त असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या 6 वी ते 10 वी पर्यंतच्या निवासी शाळेतील शिक्षकांसाठी त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा व्हावी त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानामध्ये भरीव अशी वाढ व्हावी व त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आज दिनांक 4 जून 2023 रोजी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग औरंगाबाद यांच्यावतीने विभागातील औरंगाबाद,जालना,बीड, परभणी येथे असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठीच्या 11 निवासी शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी विभागीय स्तरावरची परीक्षा घेण्यात येत आहे.


 अशा पद्धतीच्या परीक्षा प्रथमच  घेण्याचा अभिनव उपक्रम औरंगाबाद विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. शैक्षणिक पद्धतीमध्ये अमुलाग्र असा बदल घडवण्यासाठी सदरील परीक्षेच्या आयोजन करण्यात आलेले आहे. शिक्षकांची  गुणवत्ता वाढल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण  प्राप्त होते हा उद्देश या परीक्षेमागील आहे असे जयश्री सोनकवडे, प्रादेशिक उपायुक्त यांनी स्पष्ट केले. सन ११/१२ या  शैक्षणिक  वर्षापासून औरंगाबाद विभागामध्ये निवासी शाळा सुरू झालेल्या आहेत. निवासी शाळेत एकूण 57 शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी एकूण 45  शिक्षकांनी परीक्षा दिली. 12 शिक्षकांची एमपीएससीची परीक्षा असल्याने ते अनुपस्थित राहिलेले आहेत.या अभिनव  परीक्षेच्या उपक्रमास शिक्षकांनी  आणि मुख्याध्यापकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. निंबाळकर सहाय्यक संचालक यांनी  परीक्षा नियंत्रक म्हणून काम  पाहिलेले आहे . सुधीर चाटे लेखाधिकारी, आदिनाथ खेडकर वरिष्ठ समाजकल्याण यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. योगेश सरोवर, विकास बमने, त्यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.  ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी  निलेश भामरे, अस्मिता जावळे, दिलीप गिरी, सूर्यकला गोसावी, अर्चना हटकर, रघुनाथ खेडेकर, बाळू सोनवणे यांनी करण्यासाठी कामकाज पाहिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या