🌟भारतीय जनता पार्टीचे महाजनसंपर्क अभियान : जिल्ह्यात ०१ लाख बुथवर लाईव्ह कार्यक्रम....!


🌟केंद्र सरकारने मागील ९ वर्षात राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांचा हेतू🌟 

🌟पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार सर्व बुथ प्रमुखांशी संवाद🌟 

परभणी (दि.०२ जुन २०२३) : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सरकारने मागील ०९ वर्षाच्या कालावधीत राबविलेल्या विविध जनकल्याणकारी शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी या हेतूने भारतीय जनता पार्टीतर्फे ३१ मे २०२३ ते ३० जून २०२३ या दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या दरम्यान २३ जून २०२३ रोजी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरातील सर्व बुथप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील ०१ लाख बुथवर हा लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेतून दिली.

             स्वतःच्या संपर्क कार्यालयात माध्यमांशी बोलतांना आमदार सौ. साकोरे यांनी या अभियाना दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय पदाधिकारी तसेच २२७ नेते असे प्रत्येकजण १४ दिवस लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहेत. विधानसभा निहाय सभा घेणार आहेत. त्यातून लाभार्थ्यांचे संमेलन, जनसंघ, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे एकत्रिकरण, त्यातून संवाद कार्यक्रम होणार आहेत. २१ जून २०२३ रोजी सर्व तालुकास्थानी योगादिन आयोजित करण्यात आला असून यात पक्षाच्या विविध आघाड्यांच्या मोर्चांचेही विधानसभा निहाय संमेलने होणार आहेत.

            दि.२० जून ते ३० जून २०२३ या दरम्यान केंद्र सरकारने राबविलेल्या प्रत्येक योजनेसह उपक्रमांच्या माहितीची पुस्तिका घराघरापर्यंत पोहोचवली जाणार आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे जिंतूर तालुक्यात माजी आमदार विलास बापू खरात हे घनसावंगीत, आमदार बबनराव लोणीकर हे परतूर, माजी आमदार मोहन फड हे पाथरी, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे हे परभणीत तर संतोष मुरकूटे हे गंगाखेड तालुक्यात या अभियानाची जबाबदारी सांभाळणार आहेत. या अभियानानिमित्त सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरीता ११ समित्या गठीत करण्यात आल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतोष मुरकूटे, बाबासाहेब जामगे, विठ्ठलराव रबदडे, रामप्रभु मुंडे, सुरेश भुमरे, भिमराव वायवळ, मंगला मुदगलकर, मोहन कुलकर्णी आदी या कार्यक्रमात विशेष योगदान देणार आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या