🌟पुर्णा तालुक्यातील आव्हई येथे सासरच्या जाचास कंटाळून विवाहीतेने गळफास घेऊन केली आत्महत्या....!

 


🌟पुर्णा पोलिस स्थानकात पतीसह सासरा सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल🌟 

पुर्णा (दि.०३ जुन २०२३) - पुर्णा तालुक्यातील आव्हई येथे सासरच्या मंडळींच्या सततच्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून ३२ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल शुक्रवार दि.०२ जुन २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव लोचना ज्ञानेश्वर पवार असे आहे.

या घटने संदर्भात अधिक वृत्त असे की आत्महत्या केलेल्या दुर्दैवी लोचना यांचा विवाह मागील १२ वर्षापूर्वी ज्ञानेश्वर उध्दव पवार याच्या सोबत झाला होता विवाहानंतर त्यांना दोन अपत्य देखील झाली परंतु परंतु ज्ञानेश्वर पवार याला मागील काही दिवसांपासून दारु पिण्याचे व्यसन लागले व्यसनाधीन झालेला ज्ञानेश्वर पवार हा कीठलाही काम धंदा न करता पत्नी लोचनास माहेरहून पैसे आण म्हणून सातत्याने शारीरिक मानसिक छळ करु लागला त्याच्यासह सासू सासरे देखील लोचनाला शारीरिक मानसिक त्रास देत असल्यामुळे मयत लोचना हिने मागील काही महिन्यापुर्वीच विष प्राषन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता या घटने नंतर नाते संबंधातील लोकांनी मध्यस्थी करुन प्रकरण मिटवले होते परंतु यानंतर देखील पतीसह सासरच्या मंडळीकडून सततचा होणारा त्रास कमी झाला नाही अन् अखेर लोचनाने शुक्रवार दि.०२ जुन २०२३ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास लावून ऐन वटसावित्री पोर्णिमेच्या पुर्व रात्री आपणे जिवन संपवले मयत महिलेच्या मुलाने ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली सदरील घटना घडल्यानंतर पती ज्ञानेश्वर सासू सखुबाई सासरे उध्दव श्रीपती पवार यांनी गावातून तात्काळ पलायन केले या संदर्भात पोलिस पाटील संदिप सोनवने यांनी पुर्णा पोलिसांनी घटनेची माहिती दिल्याने पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड व सहकारी पथकाने तात्काळ घटनास्थळावर भेट दिली.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मयत लोचना हिच्या माहेरची मंडळी गावात दाखल झाल्यानंतर बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटने संदर्भात मयत महिलेचा भाऊ नानाराव भाऊराव जामगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन पती ज्ञानेश्वर पवार,सासरा उध्दव पवार व सासू सखुबाई उध्दव पवार यांच्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या