🌟पुर्णा तालुक्यांतील पाच गावांतील विद्युत पुरवठा खंडित : शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे पाण्याअभावी मोठे नुकसान....!


🌟तालुक्यांतील फुकटगाव,कान्हेगाव,ममदापूर,गणपुर,सुकी या पाच गावांतील विद्युत पुरवठा पंधरा दिवसापासून खंडीत🌟


पुर्णा (दि.०१ जुन २०२३) - तालुक्यांतील फुकटगाव,कान्हेगाव,ममदापूर,गणपुर,सुकी या पाच गावांतील विद्युत पुरवठा मागील पंधरा ते वीस दिवसापासून खंडित झाल्यामुळे या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतांतील विंधन विहिरीवरच्या मोटारी बंद पडल्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.


तालुक्यातील पुर्णा नदीकाठावर फुकटगाव,कान्हेगाव,ममदापूर,गणपुर,सुकी या पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी घेण्यात आलेली पिके भुईमूग भाजीपाला वेलवर्गीय काकडी कारले दोडके चवळी असे माळव देखील हे सध्याच्या परिस्थितीत पुर्णतः वाळून गेलं आहे आणि राहिलेलं उसाचे पीक हे देखील पाण्या अभावी कडक उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अक्षरशः करपून जात आहे

या गावांतील शेतकऱ्यांनी विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते सांगतात की आणखी ६ ते ७ दिवस लाईट येणारं नाही दुसरी कडून तरतूद करे पर्यंत सहकार्य करावे पण आता सर्व पिके वाळून गेली आहेत सहकार्य करण्याची अपेक्षा हि शेतकरी वर्गाकडे राहिली नाही महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांचे विद्युत प्रवाह मुद्दामून खंडीत करत आहेत की काय असं हि शेतकरी वर्गातून बोलले जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या