🌟पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शुक्रवार दि.३० जुन रोजी आयोजन🌟
परभणी (दि.२७ जुन २०२३) : राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी ऑनलाईन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शुक्रवार दि.३० जुन रोजी आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये विविध नामांकित उद्योजक, कंपन्या सहभागी होणार असून जास्तीत जास्त पदांची भरती करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागो सहाय्यक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या