🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟'औरंगजेबाने 50 वर्षे राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही'; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* बिपरजॉय: वादळाच्या 36 तासांनंतरही गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; बनास नदीला पूर, पालनपूर शहर जलमग्न.

* राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता येणार; महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना.

* कुस्तीपटूंची प्रतिक्रिया: साक्षी मलिकसह कुस्तीपटू सत्यवर्त कादियन म्हणाले, "आमची लढाई सरकारविरुद्ध नाही, तर WFI अध्यक्षांच्या चुकीच्या कृतींविरुद्ध!"

* काँग्रेसचे निलंबित बंडखोर नेते आशिष देशमुख उद्या भाजपात प्रवेश करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटल्यानंतर दिली माहिती.

* इंडोनेशिया ओपन 2023: सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी यांचा अंतिम फेरीत प्रवेश, दक्षिण कोरियाच्या कांग मिन ह्युक-सेओ सेंग जे यांचा 17-21, 21-19, 21-18 ने पराभव.

* बिग बॉस ओटीटी सीझन-2 आजपासून झाला सुरू , बॉलिवूड स्टार सलमान खानचा आगळावेगळा अंदाज;  शो  आज रात्री 9 वाजता JioCinema वर झाला सुरू. 

* केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नियंत्रण कक्षातील कामकाजाची केली पाहणी, भविष्यात बालासोरसारखी घटना टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश.

* मुसेवाला हत्याकांड: अजून आरोप निश्चितीच नाही, न्यायालयाने 28 जून रोजी सर्व आरोपींना हजर करण्याचे दिले आदेश.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्त दौऱ्यावरही जाणार असल्याची माहिती, येत्या 20 जून ते 25 जून दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यांवर असणार माहिती.

* 'औरंगजेबाने 50 वर्षे राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही'; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य.

* बॅडमिंटनमधून आनंदाची बातमी! सात्विक अन् चिराग पोहचले इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये.

* मुंबई युथ काँग्रेसच्या बैठकीत हाणामारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या.

* राज्यात पावसाने मारली दडी, पाणीटंचाईच मोठं संकट ; शेतकरी हवालदील.

* ‘आदिपुरुष’चा जगभरात डंका, पहिल्याच दिवशी पार केला १०० कोटींचा गल्ला

* खबळजनक! केदारनाथ मंदिरातील अब्जावधींचं सोन बनलं पितळ.

* गोवा आणि महाराष्ट्रासाठी महत्वाच्या तिलारी प्रकल्पासाठी ३३० कोटी रुपये मंजूर, शिंदे सरकारचा निर्णय.

* संपूर्ण पिढी मोबाईलनं उद्ध्वस्त केली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संतापले.

* यंदा नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नाही, महाविद्यालयांची तयारी अपूर्ण.

* विदर्भामध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा 

* वारकऱ्यांसाठी दोंड तालुक्यातील चौफुल्यामध्ये लावणी नृत्यांगणांनी केले खास नृत्य सादर केले व वारकऱ्यांना आपुलकीने जेवायला वाढत वारकऱ्यांची सेवा केली. 

* उष्माघाताने 34 जणांचा मृत्यू: उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उन्हाने कहर, उष्माघाताने जिल्हा रुग्णालयात गेल्या 2 दिवसांत 34 मृत्यू; मृतांमध्ये सर्वाधिक वृद्ध व्यक्ती आणि आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा समावेश.

* रियलमी स्मार्टफोनवर आरोप: स्मार्टफोनवर एन्हान्स्ड इंटेलिजेंट सर्व्हिसेस फिचरच्या माध्यमातून ग्राहकांचे कॉल लॉग्स, लोकेशन, एसएमएससह वैयक्तिक डेटा गोळा करण्याचा आरोप, एका ग्राहकाची ट्विटरवर तक्रार, चौकशी होणार.

* मुसेवाला हत्याकांड: अजून आरोप निश्चितीच नाही, न्यायालयाने 28 जून रोजी सर्व आरोपींना हजर करण्याचे दिले आदेश.

* 'पुढच्यावेळी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री', महाविकास आघाडीमध्ये असा करार; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केली टीका 

* सोन्याचे आजचे दर: मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55100 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60110 रुपये.  

* उद्धव ठाकरे गटाच्या कळव्यातील शिवसेना पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शाई फेकुन मारहाण. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या