🌟महाराष्ट्र गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतांनाही परभणीत गोवंश कत्तलीचा प्रकार उघडकीस....?


🌟भारतीय जनता पार्टीकडून गोवंश हत्येचा तीव्र निषेध : पोलिस प्रशासनाने केला गुन्हा दाखल🌟

परभणी (दि.२९जुन २०२३) : महाराष्ट्र राज्यात गोवंश कायदा लागू असतांना देखील आज बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर परभणी येथील धार रस्त्यावरील महात्मा गांधी नगरातील एका घरात बेकायदेशीरपणे गोवंशाची (बैल) हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला.

आषाढी एकादशीच्या दिवशीच आज गुरुवार दि.२९ जुन २०२३ रोजी राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू असतांनासुध्दा धार रस्त्यावरील एका घरात बेकायदेशीरपणे गोवंशाची कत्तल करण्याचा प्रकार घडतो आहे, हे कळाल्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, गोवंशाची हत्या रोखण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच बैलाची कत्तल करण्यात आली. या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांनी नानलपेठ पोलिसांना माहिती दिल्याबरोबर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, पाहणी केली. त्यावेळी गोवंशाची कत्तल झाल्याचे पुरावेसुध्दा घटनास्थळी सापडले. पोलिसांनी या प्रकाराबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान, असे प्रकार शहरासह जिल्ह्यात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामुळे समस्त हिंदु धर्मीयांच्या भावना पूर्णतः दुखावल्या आहेत. याची दखल घेवून पोलिस प्रशासनाने गोवंश हत्या बंदीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली. यापुढे असा अनुचित प्रकार घडू नये, असे नमूद करीत भाजप महानगर शाखेतर्फे शुक्रवार 30 जून रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भरोसे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या