🌟पुर्णा तालुक्यातील मौ.निळा येथील पोलिस पाटलाचा गंभीर आरोप : शासकीय कर्मचाऱ्यांचे अवैध रेती माफियांना पाठबळ ?


🌟जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात महसूल कर्मचाऱ्यांसह बीट जमादाराचाही उल्लेख🌟

पुर्णा (दि.०४ जुन २०२३)  :- पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन करून या चोरट्या रेतीची मोठ्या प्रमाणात असंख्य वाहनांतून तस्करी होत असल्याचे सर्वश्रूत असतांना व या संदर्भात अनेक वेळा तक्रारी होऊन देखील प्रशासन कुठल्याच प्रकारची दखल घेऊन ठोस उपाययोजना करीत नसल्यामुळे महसुल प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी यांचे हितसंबंध असल्याचे आरोप अनेक वेळा झाले मात्र यानंतर देखील कुठलाही प्रकारचा फरक पडला नसतांनाच आता तर चक्क पुर्णा तालुक्यातील मौ.निळा गावचे पोलिस पाटील पंडित भुजंगराव बुद्धे यांनीच जिल्हा पोलिस अधिक्षक रागसीधा आर. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दि.३० मे २०२३ रोजी लेखी स्वरुपात तक्रार देऊन मौ.निळा येथील महिला सरपंच यांच्यासह त्यांचे पती तसेच या भागाचे बीट जमादार व त्यांच्या सहकारी यांचे संगत मताने पुर्णा नदी पात्रातील रेती घाटावरून रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन करून ती चोरटी रेती ट्रॅक्टर मध्ये रेती भरून या रेतीची विनापरवाना वाहतूक व विक्री करुन शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवत अवैध रित्या उत्खनन केलेल्या चोरट्या रेतीची विक्री करुन शासनाची फसवणूक करत असल्याचे निवेदनात म्हटले असून पोलिस पाटला सारख्या जवाबदार पदावरील व्यक्तीने अश्या प्रकारे सरपंच,मंडळ अधिकारी तसेच पोलिस/महसुल प्रशासनावर अवैध रेती उत्खनन तसेच तस्करीला प्रोत्साहन देत असल्या संदर्भात प्रथमतःच आरोप केल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून यावर जिल्हाधिकारी आंचल गोयल काय निर्णय घेतात याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.


तालुक्यातील सरपंचांचे पती गोविंद सूर्यवंशी हे त्यांचा सरपंच पदाचा पदभार पाहतात व या पदाचाच फायदा घेत सर्व शासकीय व निमशासकीय कागदपत्रासह नागरिकांच्या सर्व प्रमाणपत्रावर  सरपंचांच्या डुप्लिकेट सह्या मारून प्रत्येक शासनाच्या योजनेचा फायदा घेत आहे असे देखील निळा गावचे पोलीस पाटील पंडित भुजंगराव बुद्धे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर हा शेती उपयोगी असल्यामुळे या ट्रॅक्टरचा नंबर प्लेट काढून निळा गावचे सरपंच व त्यांचे पती गोविंद सूर्यवंशी हे अवैध रेती उत्खननासाठी त्या ट्रॅक्टरचा वापर करतात व त्यांना सहकार्यासाठी पूर्णा पोलीस ठाण्याचे बीट जमादार त्यांचे सहकारी तलाठी मंडळ अधिकारी हे सर्वजण एकमेकांसह मिळून मिसळून शासनाची लूट करत असल्याचा गंभीर आरोप देखील पोलीस पाटील बूध्दे यांनी निवेदनात केला आहे या त्यांनी निवेदनात असेही म्हटले आहे की गोविंद सुर्यवंशी यांच्यावर अवैध रेती चोरीची नोंद असून त्यांचे टिप्पर सुद्धा जप्त केलेले आहे अवैध रेती उत्खनना संदर्भात पोलीस पाटील या नात्याने मी वेळोवेळी पुर्णा पोलीस स्टेशन येथे वारंवार माहिती देत असून सुद्धा माझ्या माहिती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कुणावरही गुन्हा दाखल केला जात नाही असेही निवेदनात म्हटले असून निवेदनात पुढे असे म्हटले आहे की या संदर्भात मी स्वतः यांचे रेती वाहतूक करत असताना ट्रॅक्टर जप्त करून दिले असता पोलिसांनी ट्रॅक्टर धारकाकडून पाच लाख रुपये घेऊन ट्रॅक्टर जागीच सोडून देण्याचे कार्य केले एकिकडे  शासन सांगत असतो की गौण खनिज उत्खनन करत असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणे महत्त्वाचे आहे यानुसार पोलीस पाटील हा गावचा मुख्य घटक असतो आणि एकीकडे पोलीस पाटील यांनी पकडून दिलेल्या अवैध उत्खनन करणाऱ्या वाहनास पोलीस प्रशासन हे कुठलीही कार्यवाही न करता त्यांच्याकडून काही आर्थिक व्यवहार कर घेऊन त्यांना मुक्त करतात असा आरोप निळा गावचे पोलीस पाटील यांनी निवेदनामार्फत जिल्हाअधिकारी याना केले आहे  याप्रकरणी महसूल प्रशास व बीट पोलीस जमादारची  सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निळा गावचे पोलीस पाटील पंडित भुजंगराव बुद्ध यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अवैध रेती उपसा करणाऱ्या व्यक्तीस व त्यांच्या वाहनास जप्तीचं  त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे हे महत्त्वाचं आहे असं पोलीस पाटील यांनी  निवेदनात नमूद केले आहे...टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या