🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारीची तत्काळ दखल....!

🌟दिव्यांग तपासणी मोहिमेत मनमानी करणाऱ्या डॉक्टरांना शासकीय रुग्णालय प्रशासनाची तंबी🌟

परभणी (दि.२८ जुन २०२३) - परभणी जिल्ह्यामध्ये सध्या दिव्यांगाची तपासणी मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे यात अस्थिव्यंग दिव्यांगा व्यतिरिक्त इतर दिव्यांगांसाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शंभर दिवस तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे या अत्यंत सत्य उपक्रमात परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील दिव्यांगाची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले डॉक्टर हलगर्जीपणा करतात व तपासणी कामी मनमानी करत आहेत याबाबतची तक्रार प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती, निवेदन परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे यांनी स्वीकारले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिव्यांगांच्या तपासणीमध्ये होत असलेल्या हलगर्जीपणा बाबत अनेक दिव्यांगानी प्रहार जनशक्ती पक्षाकडे केलेल्या तक्रारींचे पुरावे सादर केले तसेच कर्ण बधीर दिव्यांगांची तपासणी  करणारे तज्ञ नसल्या बाबत ही तक्रार केली.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने  करण्यात आलेल्या या तक्रारी ची गंभीर दखल अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी श्री. प्रताप काळे यांनी घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार वाजता जिल्हा शल्य चिकित्सक व  दिव्यांग तपासणी कार्यक्रमाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावली. बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या तक्रारी बाबत बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिव्यांग तपासणी मोहिमेत होत असलेल्या हलगर्जीपणा बाबत श्री. प्रताप काळे यांनी सूचना दिल्या व दिव्यांग तपासणी मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना तपासणी साठी वेळेवर उपस्थित राहावे व तपासणी कमी मनमानी न करण्याच्या सूचना देणे बाबत जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकी नुसार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दि. २६ जून २०२३ रोजी दोन वेगवेगळे कार्यालयीन आदेश काढून दिव्यांग तपासणी करणाऱ्या सर्व डॉक्टरांना रोज सकाळी ९.३० ते १२.३० व दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत उपस्थित राहून सेवा देने बाबत तसेच दर मंगळवारी कर्णबधिर दिव्यांगाच्या तपासणी बाबत कार्यालयीन आदेश काढले आहेत तसेच दिव्यांग तपासणी कामात कसूर करणाऱ्या व वेळेत उपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कठोर प्रशासकीय कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारी मुळे दिव्यांग तपासणी मोहिमेत तपासणी साठी येणाऱ्या दिव्यानांना न्याय मिळाला आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर चिटणीस वैभव संघई, मीडिया प्रभारी नकुल होगे, ॲड सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, उद्घव गरुड, बाळा नरवाडे, शेख बशीर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या होत्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या