🌟प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच मनपा प्रशासन खडबडून जागे....!


🌟शहरातील मान्सुन पुर्व नाले सफाईला सुरुवात🌟

परभणी (दि.०५ जुन २०२३) - जुन महिना उजाडला तरी परभणी शहर महानगरपालिकेने शहरातील नाल्यांची मान्सुनपुर्व नाले सफाई सुरु केली नव्हती, नियमाप्रमाणे पावसाळा सुरु होण्या एक महिना आधी म्हणजेच मे महिन्यामध्ये शहरातील सर्व नाल्यांची नाले सफाई होणे अपेक्षित असते. परंतु पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही नाले सफाई बाबत मनपा प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेत होते व नाले सफाई बाबत कुठलीच हालचाल न दिसल्याने दि. २९ मे 2023 रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना एक निवेदन देवून शहरातील सर्व मुख्य नाल्यांची मान्सुन पूर्व नाले सफाई तात्काळ सुरु करावी अशी विनंती करण्यात आली शिवाय तत्काळ नाले सफाई सुरू न केल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील सर्व मुख्य नाल्यांची स्वखर्चाने सफाई करुन नाल्यातील गाळ मनपा कार्यालयात आणून टाकला जाईल असा इशारा देखील निवेदनात देण्यात दिला होता.




निवेदन दिल्यानंतर मनपा प्रशासनाने निवेदनाची तात्काळ दखल घेतली आणि ४ जुन २०२३ पासून शहरातील सर्व मुख्य नाल्यांची मान्सुनपुर्व नाले सफाई सुरु करण्यात आली. या बाबत मनपा प्रशासनाने प्रहार जनशक्ती पक्षास कळविल्यानंतर आज पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहरातील बस स्थानक रोड, ललीत कला भवन व सेवक नगर येथील मनपा ने सुरू केलेल्या नाले सफाईच्या कामाची पाहणी केली व सुरू असलेल्या नाले सफाई बाबत समाधान व्यक्त केले व उशिरा का होईना पण मनपा प्रशासनाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर नाले सफाई सुरू केली हे विशेष.

आंदोलनाचा इशारा देणाऱ्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहरप्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, मिडीया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, अंकुश गिरी, रामेश्वर पुरी, शेख बशीर, बाळा नरवाडे, शेख अल्ताफ व महिला आघाडीच्या ॲड. सुवर्णाताई देशमुख, सुषमाताई देशपांडे, सोनालीताई गुट्टे, आरतीताई जाधव इत्यादींनीच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या