🌟पुर्णा-परभणी-परळी मार्गे तिरुपतीसाठी विशेष गाडी....!


🌟पुर्णा तालुक्यातील नागरिकांमध्ये जल्लोशाचे वातावरण🌟 

मराठवाड्यातून तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने पुर्णा-परभणी-परळी मार्गावरून पुर्णा-तिरुपती विशेष प्रवासी गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या गाडीचा क्रमांक ०७६०९ असा आहे.

पुर्णा-तिरुपती ही विशेष गाडी पुर्णा जंक्शन स्थानकावरून दि.०३ जुलै २०२३ ते २८ जुलै २०२३ दरम्यान दर सोमवारी सकाळी १०-२५ वाजता सुटेल आणि परभणी,गंगाखेड,परळी,लातूर रोड,उदगीर,बिदर,विकाराबाद,लिंगमबल्ली,सिकंद्राबाद,पगीडीपल्ली,नालगोंडा,मिर्याल्गुदा,नदीकुडे,सतेनापल्ली,गुंटूर,तेनाली,बापटला,चिरला,आंगोल,कावली,नेल्लोर,गुड्डूर,रेनीगुंठा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी सकाळी १०-४५ वाजता पोहोचणार आहे.

तर तिरुपती-पुर्णा येणारी विशेष गाडी क्रमांक ०७६१० ही तिरुपती येथून दि.०४ जुलै ते २९ आगष्ट २०२३ दरम्यान दर मंगळवारी दुपारी ०३-१० वाजता सुटेल आणी गेलेल्या मार्गावरूनच पुर्णा येथे बुधवारी दुपारी ०२-३० वाजता पोहेचेल या विशेष गाडीत स्लिपर,जनरल,वातानुकूलीत तृतीय श्रेणी,वातानुकूलीत द्वितीय श्रेणी असे एकून १८ कोच अर्थात डब्बे राहणार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या