🌟परभणी जिल्ह्यामध्ये मान्सुन लांबल्याने पाणीटंचाई : लोअर दुधना धरणातून नदीपात्रात पाणी सोडनार....!


🌟आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश🌟

परभणी (दि.२१ जुन २०२३) - परभणी जिल्ह्यामध्ये मान्सुन लांबल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे लोअर दुधना धरणातून नदीपात्रात जनावरांसह शेती पिकांना  पाणी सोडावे अशी मागणी परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुख्य अभियंता यांच्याकडे केली होती, या मागणीला यश आले असून दोन दिवसात नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे.

यंदा जून महिना संपत आला तरी अजुन मान्सूनचे आगमन झाले नाही.उलट उन्हाची तिव्रता वाढलेली आहे.त्यामुळे पाणी पातळी खोलवर जाऊन पाणी टंचाई सुरु झाली आहे.ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.तसेच जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.अशा स्थितीत  लोअर दुधना धरणातून नदीपात्रात पाणी सोडले तर किमान जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल तसेच नदीकाठावरील गावातील पाणी टंचाई दुर होण्यास मदत होणार आहे.त्यासोबतच चारा पिकांना लाभ होईल.म्हणून नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी आमदार राहुल पाटील यांनी मुख्य अभियंता यांच्याकडे केली होती,या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे,येत्या दोन दिवसात धरणातून पाणी सोडले जाईल  अशी माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या