🌟परभणी येथील अष्टभुजा देवी मंदिरच्या जवळील चौकात विज प्रवाह उतरलेल्या खांबाला चिटकुन गाईचा मृत्यू...!


🌟गाईच्या मुत्यु प्रकरणात कारवाई करा : शिवसेना महिला आघाडीची मागणी🌟

परभणी (दि.30 जुन 2023) - अष्टभुजा देवी मंदिरच्या जवळील चौकात विज प्रवाह उतरलेल्या  खांबाला चिटकुन गाईचा मृत्यू झाल्या प्रकरणात महावितरण कंपनीतील जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .

शहरांमध्ये अनेक ठिकाणी  महावितरण कंपनीचा गलथान कारभार समोर येत असून अनेक भागात  लोंबकळणाऱ्या तारा,उघड्या डीपी यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी विद्युत पोलमध्ये वीज प्रवाह उतरत आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अशा दिवसात मोठी दुर्घटना होऊ शकते, परंतु महावितरण कंपनी या बाबीकडे लक्ष देत नसल्याने महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका मनुष्यासह प्राण्यांना बसत आहे. त्यामुळे तात्काळ लोंबकळणाऱ्या विज तारा दुरुस्त कराव्यात, उघड्या डीपींचा बंदोबस्त करावा, तसेच ज्या भागात सातत्याने वीज प्रवाह उतरत आहे अशा ठिकाणी दुरुस्ती करावी त्यासोबतच महानगरपालिकेने मोकाट जनावरांना पकडून त्यांची रवानगी कोंडवाड्यात अथवा गोशाळेत करावी मोकाट जनावरे पकडुन ते कोडवाड्यात टाकायची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून महानगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यावर सुद्धा तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेना महिला विधानसभा संघटक अंबिका डहाळे, उप शहर प्रमुख संभानाथ काळे,वंदना कदम,युवा सेना शहर प्रमुख विशू डहाळे, गणेश मुळे, अमोल कदम,स्वप्नील भारती,मीरा कथले, शुभम हाके, शांताबाई मुथा,निलेश चंद्रवाड, कैलास पवार,पारस मुथा, अजय फुलारी,गयाबाई शिंदे,उषाताई जोगळेकर, गंगा काळे,आदी महिला आघाडी व युवा सैनिक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या