🌟सामान्य जनतेची विकासाची कामे करून शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) संघटन मजबूत करा....!


🌟विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे प्रतिपादन🌟  

✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर (दि.०४ जुन २०२३) : जाती - धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या प्रश्नांवरून नव्हे तर गोर - गरीब व सामान्य नागरिकांचे विकास कामे करून शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत करा.स्थानिक गावकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी पुढाकार घ्या आणि जनतेच्या विकासाच्या व कल्याणकारी योजनांच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर कार्य करा असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले. 


शिवसेना पक्ष व संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाभरात संघटनात्मक कार्याचा आढावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात संवादपर शिवगर्जना... "आता जिंकेपर्यंत लढायचं" या संपर्क मोहिमेचे गावागावात सुरू आहे.त्यादरम्यान अंबादास दानवे यांनी आज रत्नपुर तालुक्यातील सुल्तानपूर  व बाजार सावंगी येथील पदाधिकारी व शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी बाजार सावंगी येथे ते बोलत होते. 

श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजना,विजेची समस्या, पिक कर्ज,पिक विमा व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परंतु अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांची समस्या ओळखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसैनिकाने कार्य करावे तसेच हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहेत. परंतु या संघटनेने कधीही कोणत्या धर्माचा द्वेष केलेला नाहीत.सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुध्दा याच विचारांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्याच विचाराला घेऊन आपल्याला आगामी काळात सामान्य जनतेसाठी कार्य करायचे असल्याचे सुद्धा यावेळी बोलतांना दानवे म्हणाले.

या मोहिमेप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगांवकर,तालुकाप्रमुख राजू वरकड,तहसीलदार सुरेंद्र देशमुख,विधानसभा संघटक गणेश अधाने,उपतालुका प्रमुख कृष्णा घुले, विभाग प्रमुख विजय चव्हाण, उपविभाग प्रमुख बाळू खुटे,किशोर काळे,सतीश शुक्ला,सतीश कुकलारे,सरपंच आप्पासाहेब नलावडे,उपसरपंच कारभारी नलावडे,अविराज निंकम,कल्याण नलावडे,शाखाप्रमुख अमोल दहातोंडे,योगेश गायकवाड,अशोक नलावडे, विशाल घुले,अंकुश नलावडे, कडूबा काळे,चंद्रकांत चव्हाण, कारभारी जाधव, कैलास वाकळे, बंडू वाघ,अतिश वरकड, गणेश वाकडे, शरद चव्हाण व संदिप गायकवाड आधी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या