🌟‘डिजीटल इंडिया सप्ताह 2023’चे जुलैमध्ये आयोजन...!


🌟यासाठी देशभर विविध तांत्रिक माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार - जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी (दि.28 जुन 2023) : देशात अभूतपूर्व डिजिटल परिवर्तन साजरे करण्यासाठी, भारत सरकार 'डिजिटल सप्ताह 2023’ (डिजीटल इंडिया वीक 2023) चे आयोजन करत आहे. भारताची तांत्रिक प्रक्रिया जगासमोर प्रदर्शित करणे, स्टार्टअपसाठी उद्योगासाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश्य आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार असून, यासाठी देशभर विविध तांत्रिक माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


या देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि या अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची अद्यावत माहिती एसएमएस,  ईमेलवर प्राप्त होण्यासाठी डिजिटल इंडिया विकच्या https://www.nic.in/diw2023-reg/ या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. तरी परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या लिंकवर क्लिक करून नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र परभणी आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या