🌟परभणी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी भरती रद्द करा....!


🌟संभाजी ब्रिगेड कडून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना निवेदन🌟  

परभणी (दि.१० मे २०२३) : परभणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील बाह्य यंत्रणेमार्फत शिपाई, डाटाएन्ट्री ऑपरेटर व कंत्राटी अभियंता पदासाठीच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले असून ती भरती रद्द करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या एका शिष्टमंडळाने केली आहे.

            जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनात संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख, भाजपा युवा मोर्चाचे विलास जोंधळे, भिम टायगर सेनेचे अर्जून पंडीत, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, तालुकाध्यक्ष प्रसाद देवके, स्वप्नील गरुड, विक्रम जैस्वाल आदींनी या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारी यादीची पडताळणी केली असता जिल्हा परिषदेंतर्गत सेवा निवृत्त किंवा कार्यरत कर्मचार्‍यांच्या पाल्यांची किंवा जवळच्या नातलगांचाच यादीत समावेश आहे. त्यामुळे ही भरती संशयास्पदरीत्या झाली असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी व नव्याने भरतीची प्रक्रिया सुरु करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या