🌟पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच : ताडकळस फाट्यालगत दुचाकीस्वाराचा भयंकर अपघात...!


🌟भयंकर अपघातात दोन जन गंभीर जखमी🌟

पुर्णा (दि.०३ मे २०२३) - पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर अपघातांचे सत्र सातत्याने सुरुच असून या मार्गावर महिन्यातून दोन/तिन अपघात होतच असल्यामुळे मागील दोन वर्षात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असाच गंभीर अपघात आज बुधवार दि.०३ मे २०२३ रोजी सकाळी १०-०० ते १०-३० वाजेच्या सुमारास या पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील ताडकळस फाट्यालगत घडला दोन दुचाकीस्वार नांदेडच्या दिशेने सुसाट वेगाने जात असतांना झालेल्या अपघातात मोटारसायकल वरून पडून अपघात झाल्याने गंभीर जखमी झाले.


यावेळी रस्त्यावरील वाहनधारक नागरिकांनी ताडकळस फाट्यालगतच असलेल्या पुर्णा-ताडकळस मार्गावरील शासकीय ग्रामीण रुग्णालयात ॲम्बुलन्स द्वारे जखमी दुचाकी स्वारांना पोहोचती केले यावेळी शासकीय ग्रामीण रुग्नालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले असल्याचे आरोग्य अधिकारी एन.एस.देशमुख यांनी कळविले या दुचाकी अपघातातील दुचाकीस्वार अजय मोहन बळवंते यांना जास्त मार असल्यामुळे त्यांचा रक्तस्राव जास्त झाला असल्याचे एन एस देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तर त्यांचे दुसरे सोबती विठ्ठल तातेराव काटलेवाड यांना सुद्धा बराच मार लागल्यामुळे पुढील उपचारकामी त्यांना देखील नांदेडलाच पाठवण्यात आले.

दरम्यान दुचाकीस्वार नांदेड येथील रहिवासी असल्याचे एका जवळ मिळालेल्या आधार कार्ड वरुन समोर आले आहे तर त्यांचे सोबती कुठले आहेत अद्याप स्पष्ट नाही पण अंदाजे विठ्ठल दत्तराव काटलेवाढ हे सुद्धा नांदेड जिल्ह्यातील असल्याचे बोलले जात आहे हे दोघे ज्या पॅशन प्रो दूचाकी गाडीवर प्रवास करत होते त्या गाडीचा क्रमांक एम.एच.२६ एवाय २३५६ असा आहे दरम्यान घटनास्थळावर पोलिस पोहोचण्या पुर्वीच नागरिकांनी त्यांच्या मदतीला धावून त्यांना उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्नालय पुर्णा येथे रवाना केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या