🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन संपन्न....!


🌟यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली🌟


पुर्णा (दि.०४ मे २०२३) - पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिना निमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.


या कार्यक्रमाला पुर्णा पंचायत समितीचे माजी सभापती अशोकराव बोकारे,पुर्णा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक माणिकराव बोकारे,सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ.कांचनबाई बोकारे,तंटामुक्ती अध्यक्ष तथा चेअरमन सोपानराव बोकारे,मुख्याध्यापक गोविंद नलबलवार सर,शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोकारे,उपाध्यक्ष बापूराव बोकारे,सर्व सदस्य,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व गावातील जेष्ठ मंडळी,सर्व युवा वर्ग,माता भगिनी यांची उपस्थिती होती.

या कलाविष्कार सोहळ्यात १३ बहारदार नृत्य सादरीकरण करण्यात आले.एकाहून एक दर्जेदार गीते प्रेक्षकांना याची देही,याची डोळा अनुभवता आली. सर्व गावकरी मंडळींनी नृत्याविष्कारावर खुश होऊन सढळ हाताने ३५२९० रुपयांचा निधी शाळा विकासासाठी दिला.


*🎖️श्री भागवत शिंदे सर यांनी घेतलेला मराठी विषयाचा जोडाक्षरयुक्त शब्द लेखन उपक्रम यातील इ.6 वी ते इ.8 वीतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वाटप करण्यात आली.*


*🎤श्री भागवत शिंदे सरांनी अगदी अस्खलित,दर्जेदार व प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सूत्रसंचालन केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री आबनराव पारवे सर यांनी मानले.*


*✌️कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री गोविंद नलबलवार सर,श्री भागवत शिंदे सर,श्री गणेश कुऱ्हे सर,श्री विलास बोकारे सर,श्री आबनराव पारवे सर,श्री दत्तराव बोकारे,श्रीमती योगिता कुलकर्णी मॅडम व सर्व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.*


*🟢स्नेहसंमेलन अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे पार पडले .*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या